दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांनी माझ्यावर खोटे आरोप करू नयेत पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांनी माझ्यावर खोटे आरोप करू नयेत पृथ्वीराजसिंह यादव
शहरातील खाजगी जमिनीवर आरक्षण आंदोलन संघटना बंद करणार का केला सवाल
शिरोळ विकास आराखड्यातील जमीनआरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही

शिरोळ / प्रतिनिधी

राजकीय व आर्थिक स्वार्थ साधण्यासाठीच आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे हे नेहमीच दुटप्पी भूमिका घेऊन शिरोळ शहरातील विकास आराखड्यातील जमीन आरक्षणासंदर्भात माझ्यावर खोटे नाटे आरोप करीत आहेत.पण शिरोळ शहरातील नागरिकांच्या खाजगी जमिनीचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.यामुळे पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे धनाजी चुडमुंगे हे आपली संघटना बंद करणार का असा सवाल युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.तसेच खाजगी जमिनीवर पडलेले आरक्षण रद्द होत नाही.तोपर्यंत टप्प्याटप्प्याने लढा तीव्र करणार असल्याचा पूर्णोउच्चार त्यांनी यावेळी केला.

 

शिरोळ येथील छत्रपती शिवाजी तक्त येथे शिरोळ शहर विकास आराखड्यातील जमीन आरक्षण संदर्भात युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना यादव यांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करीत शिरोळ शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. शहरातील अनेक नागरिकांच्या खाजगी जमिनीवर विकास आराखड्याच्या माध्यमातून आरक्षण टाकण्यात आले आहे.तसेच शाळा बगीच्या मटन मार्केट कत्तलखाने यासाठी जमीन प्रस्तावित केल्याचा अहवाल नगरपरिषदेने प्रसिद्ध केला आहे.तरीही धनाजी चुडमुंगे हे कुणाचेतरी राजकीय तळी घेऊन जमीन आरक्षणासंदर्भात माझ्यावर बेछूट आरोप करीत सुटले आहेत.पण त्यानी जमीन आरक्षण रद्द संदर्भात नागरिकांची कल्लेश्वर मंदिरात पहिली बैठक बोलावली या बैठकीत धनाजी चुडमुंगे यांनी स्वतःहून मी बैठकीला येऊ का असे मला विचारले मीही गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असते म्हणून त्यांना बोलवले चुडमुंगे यांनी त्या बैठकीत विकास आराखड्यातील जमीन आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला परत आरक्षण संदर्भात नगरपालिकेत झालेल्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका बदलली विकास आराखड्यातील जमीन आरक्षणाची दुरुस्ती करूया अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली पण मी कोणत्याही परिस्थितीत शहरातील नागरिकांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण आम्ही मान्य करणार नाही ते आरक्षण रद्द करावे अशीच भूमिका मांडली होती.आजही त्या भूमिकेशी मी ठाम आहे असे पृथ्वीराजसिंह यादव यांनी सांगितले.
धनाजी चुडमुंगे हे केवळ आपल्याला श्रेय मिळावे आपला राजकीय व आर्थिक स्वार्थ साधावा यासाठी सातत्याने आपली भूमिका बदलून जनतेची दिशाभूल करत असतात कोणाच्यातरी सांगण्यानुसार चुडमुंगे यांनी नगरपरिषदेबरोबर संधान बांधून विकास आराखडातील दुरुस्ती केल्या त्यांनी मर्जीतल्या लोकांच्या जमिनीवर आरक्षण उठवले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकले याचा खुलासा त्यांनी नागरिकांची बैठक घेऊन करणे गरजेचे होते.पण घाई गडबडीने नगरपरिषदेच्या आवारात पत्रकार परिषदेत जमिनी आरक्षण जाहीर केले व यावेळी पाटील वगळता अन्य कोणत्याही नागरिकांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण नसल्याचे सांगून आंदोलन अंकुशने जमिनीवरील आरक्षण उठवले असे बोलून दाखवले. तसेच जर नागरिकांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण असेल तर आपली आंदोलन अंकुश संघटना बंद करू असे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
शिरोळ नगरपरिषदेने जाहीर केलेल्या विकास आराखड्यामध्ये शहरातील सीताबाई कृष्णा कांबळे, एकनाथ भगवान/रावसाहेब कृष्णा कांबळे ( गटनंबर ९ ०४ )जयसिंग दत्तात्रय पाटील (गट नंबर ९१० ) संतोष/अजित गोपाळ पाटील ( गट नंबर९११ )रंजना नारायण पाटील व इतर(गट नंबर३३६६ ) बाळासो रामचंद्र सावंत (गट नंबर ९१५ )शंकर आप्पा बाबु पुजारी(गटनंबर०४ )
आप्पासो बाबू धनगर (गटनंबर ०५ )
धोंडीबा / नरसिंगा रामू धनगर (आणि मंगल नंदकुमार संकपाळ ( गट नंबर ०६ ) या नागरिकांच्या वैयक्तिक जमिनीवर आरक्षण पडले आहे.मग धनाजी चुडमुंगे हे आपली आंदोलन अंकुश संघटना पत्रकार परिषदेत घोषित केल्याप्रमाणे बंद करणार का असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या विचाराने मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे.मी निस्वार्थीपणे जनतेची कामे करतो माझ्या संपर्क कार्यालयात सकाळपासूनच विविध कामासाठी नेहमी जनतेचे गर्दी असते मी कोणताही स्वार्थ न ठेवता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो याची माहिती शिरोळकरांना आहे.मला माझ्या यादव कुटुंबियाचे पाठबळ आहे.त्यामुळे मला कोणताही आर्थिक स्वार्थ न ठेवता काम करण्याची सवय आहे.तुमच्यासारखे देणग्या गोळा करून आपले पोट किंवा जीवनचरित्र चालवावे लागत नाही.तुम्ही मात्र वारंवार जनतेकडून देणग्या गोळा करतात आपला राजकीय आणि आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून दुटप्पी भूमिका घेऊन एखाद्या चांगल्या माणसावर बेछूट आरोप करता कुणाला तरी राजकीय पाठबळ मिळावे यासाठी चांगल्या विकास कामात खोडा घालता पाच वर्षे एकही तक्रार न करता बसलेले चुडमुंगे हे नगरपालिकेवर प्रशासक आल्यावरच तक्रार करीत आहे.यादव गटाची सत्ता असली की यादव पैसे खातात म्हणून आरोप करायचे यादव गटाची सत्ता नसली की दोघे मिळून पैसे खातात असे आरोप करून जनतेची दिशाभूल करायची आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा तुम्ही प्रयत्न करता केवळ वैयक्तिक श्रेयवादासाठी जमीन आरक्षणासंदर्भात तुम्ही माझ्यावर खोटे नाटे आरोप केला.यापुढे असले आरोप खपवून घेतले जाणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला.तसेच मी दिलेले माहिती चुकीची असेल तर तुम्ही माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकता पण शिरोळ शहरातील सर्व नागरिकांच्या खाजगी जमिनीवरील आरक्षण जोपर्यंत रद्द होत नाही.तोपर्यंत माझा लढा टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे.बेमुदत गाव बंद करणे नगरपरिषदेवर मोर्चा काढणे न्यायालयात न्यायालयीन लढाई लढणे यासाठी मी नेहमीच पुढाकार घेऊन शिरोळ विकास आराखड्यातील जमीन रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी माजी नगरसेवक पंडीत काळे,इम्रान अत्तार,माजी सरपंच गजानन संकपाळ,धनाजीराव पाटील-नरदेकर,विजय आरगे,राहूल यादव,विराजसिंह यादव,विनोद मुळीक , बाळासो कोळी,रमेश पाटील,ओंकार गावडे,विठ्ठल भाट, यांच्यासह आरक्षण पिडीत नागरीक मोठया संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!