विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रज्ञाशोध सराव परीक्षांची नितांत गरज : योगेश जमदाडे

Spread the love

शिरोळ येथे दत्तनगर केंद्रस्तरीय इयत्ता चौथीची प्रज्ञाशोध सराव परीक्षा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असते भविष्यकाळात स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध सराव परीक्षांची नितांत गरज असते शिरोळ तालुक्यात शिक्षण विभागाच्या वतीने अशा प्रज्ञाशोध सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन शिरोळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी केले.

 

स्व पुष्पलता वसंत ढेकणे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मातोश्री चाईल्ड क्लिनिक व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली दत्तनगर केंद्रस्तरीय इयत्ता चौथीसाठी सराव प्रज्ञाशोध परीक्षा राजश्री शाहू विद्यामंदिर शिरोळ नंबर 1 येथे उत्साहात पार पडली परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश जमदाडे बोलत हे होते.

 

 

शिरोळ पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते दत्तनगर केंद्रातील 13 शाळांमधील चौथीच्या 284 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.

 

परीक्षेतील प्रथम – अमित कुमार कुटकुळे (राजश्री शाहू विद्यामंदिर नंबर 1) द्वितीय – गीता गणेश कुरे (कन्या विद्या मंदिर दत्तनगर) तृतीय – ईश्वरी राजेंद्र पाटील (कन्या विद्यामंदिर क्रमांक 2) चतुर्थ – आकांक्षा उत्तम बेंद्रे (कन्या विद्या मंदिर क्रमांक 2 )पाचवा क्रमांक – ब्रामी बाबासो बोरगावकर (कन्या विद्या मंदिर दत्तनगर) सहावा क्रमांक – तेजस्विनी प्रताप माने (कन्या विद्या मंदिर क्रमांक 2) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी परीक्षा केंद्रावर भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शिरोळ तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे भविष्यात याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

 

रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी स्वागत केले.मातोश्री चाइल्ड क्लिनिकचे प्रमुख डॉ.अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले.रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे यांनी आभार मानले.सेक्रेटरी तुकाराम पाटील (भैय्या),सदस्य सचिन सावंत, राजाराम विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव कांबळे, कन्या विद्यामंदिरच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुजाता पाटील, राजश्री शाहू विद्यालय व्यवस्थापन समितीच्या सदस्या संजीवनी चुडमुंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

 

शाहू विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका विमल वर्धन कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नूरमहम्मद मुल्ला, अध्यापक सनी सुतार, बाळासाहेब कोळी, शरद सुतार, रमजान पाथरवट, दीपक वावरे,धनाजी आवळे, मौलाअली मुल्ला, सुशांत कांबळे, सतीश नलवडे,भारती इंगळे,वहिदा मुल्ला, दीपमाला कोळी, सुनंदा पाटील, राजश्री टोणे, विद्या पाटील, रूपाली भगाटे, प्रियंका जगदाळे, श्री ऐवाळे रत्नाकर यांच्यासह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!