लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिरोलीत पोलिसांचे संचलन

Spread the love
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वतीने मंगळवारी सकाळी 10 वाजता पुलाची शिरोली गावात रुट मार्च करण्यात आला.शहरात लॉंग मार्च काढत दंगल काबू पथकची प्रात्यक्षिके करण्यात आली.

दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवारी शिरोली गावातून संचलन करण्यात आले.या संचालनासाठी राखीव पोलीस दलाची तुकडी ही बोलविण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने शिरोली एमआयडीसी पोलीस प्रशासनाने निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.शांतता सुव्यवस्था रहावी या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्यापासून संचलन करण्यात आले.
संवेदनशील भाग,मुख्य बाजारपेठ, मिश्र वस्ती, महत्त्वाचे चौक ते पोलीस ठाणे असे संचलन करण्यात आले. यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
error: Content is protected !!