इचलकरंजी / प्रतिनिधी
माणकापूर येथे निसर्गराजा ग्रुपच्या वतीने ग्रामदैवत मलकारसिध्द याञा व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वस्ञनगरीतील जेष्ठ पञकार रामचंद्र ठिकणे यांना राज्यस्तरीय पञकार भूषण प्रेरणा पुरस्कार व जेष्ठ फोटोग्राफर छोटूसिंग रजपूत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण उद्योगपती,साहित्यिक वसंत सुतार,माजी सरपंच सदाशिव कोळी,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मांजरे,उद्योजिका सौ.संजनकुमारी सुतार, सेवानिवृत्त मेजर भिमराव नराटे,कवयित्री सौ.सुवर्णा पवार,रावसाहेब भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सामाजिक,पञकारिता, साहित्य,शैक्षणिक, साहित्य,उद्योग-व्यवसाय,कला,क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नजमा शेख,पञकार तानाजी बिरनाळे,सौ.नंदा नार्वेकर,डॉ.ओंकार निंगनुरे ,शिवानी मोरबाळे,अभिनव सुतार यांच्यासह विविध
व्यक्तींना देखील राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीमती नंदिनी कदम ,संजय सासणे,बाबू अपराज,सखाराम जाधव,कवि सरकार,मोनिका जाधव यांच्यासह विविध मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्ती,ग्रुपचे सर्व पदाधिकारी,सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष पञकार शिवाजी येडवान यांनी केले.सूञसंचालन सात्ताप्पा सुतार यांनी तर आभार प्रदर्शन ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल काटकर यांनी केले.