शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ टीचर्स प्रिमीयर लीग२०२४ सहाव्या पर्वातील तीन दिवसीय क्रिकेटच्या आनंद सोहळ्यास शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता राजर्षी शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर येथे सुरुवात होत आहे. तर बक्षिस वितरण रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या वर्षी शकिल पिरजादे यांचा एस.पी. वॉरियर्स, रविकुमार पाटील यांचा आर.पी.चॅलेंजर्स,नवीद पटेल यांचा शेर ए नविद, सुनिल एडके यांचा वारणा टायगर्स तर संतोष ठोमके यांचा मामा’ज रायडर्स या पाच संघांमध्ये साखळी पध्दतीने सामने खेळून विजेते -उपविजेते निवडले जाणार आहे.
त्यासाठी आकर्षक चषक, खेळाडूसाठी कीटस,त्रयस्थ पंच,वैयक्तिक बक्षिसे यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय जेष्ठ शिक्षकांचे ही तीन संघ तयार केले आहेत.
शिरोळ तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना उपशाखा शिरोळ यांचे संयोजनाखाली शिरोळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे यंदाचे ६ वे वर्ष आहे.गेली ५ वर्षे स्पर्धा सर्व संघटना प्रतिनिधी व क्रिकेटप्रेमी शिक्षकांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पडल्या आहेत.