कुरुंदवाड / प्रतिनिधी
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या येथील कृष्णा वेणी यात्रेच्या खाऊ स्टॉल आणि कॉस्मेटिक खेळणी विक्रेत्यांच्या स्टॉलच्या जागेचा लकी ड्रॉ तबक उद्यान येथील जिम्नेशियम हॉल येथे काढण्यात आला. 18 खाऊधारकांना तर 48 विक्रेत्यांना लकी ड्रॉ पद्धतीने जागा वितरण करण्यात आली.
उर्वरित जागेंसाठी सात तारखेला दुपारी बारा वाजता लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी अशीष चौहान यांनी दिली.दरम्यान विक्रेत्यांना लकी ड्रॉ पद्धतीने जागा वितरण केल्यानंतर विक्रेत्यांच्या सोयीसाठी म्हणून जिम्नेशियम हॉल येथे संभाव यात्रेच्या स्टॉलचे क्रमांकानुसार तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे रेखांकन दाखविण्यासाठी ठेवण्यात आले होते.
कृष्णा वेणी यात्रेच्या खाऊ स्टॉल आणि कॉस्मेटिक खेळणी विक्रेत्यांना जागा वितरण करण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता लकी ड्रॉ काढण्यासाठी आवाहन करण्यात आले होते त्यानुसार या प्रक्रियेत 66 विक्री त्यांनी सहभाग घेतला होता.ताहीर पठाण या लहान बालकाच्या हस्ते एका काचेरी बरणीत ठेवलेल्या स्टॉल धारकांच्या चिट्ट्या काढण्यात आल्या त्यानुसार जागेचे समजपत्र स्टॉलधारकांना देण्यात आले आहे.
यात्रेमध्ये यात्रेच्या स्वागत द्वारावर ऊस रसवंतीच्या स्टॉल धारकांना जागा देणे बाबत आराखड्यामध्ये बदल करण्यात आला.ऊस रसवंती आणि उर्वरित जागेच्या लकी ड्रॉ साठी खाऊ स्टॉल धारक आणि विक्रेत्यांनी सात तारखेपूर्वी पालिकेत आपली अनामत रक्कम जमा करून लकी ड्रॉ च्या दिवशीचे आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे आणि जागा मिळवावी असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी केले आहे.यावेळी अभिजीत कांबळे,सचिन थरकार,किशोर रजपूत,शशी कडाळे आदी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.