सन्मती सहकारी बँकेचे ऑडिट विभागाचे चीफ मॅनेजर अनंत पुजारी यांची कुरुंदवाड येथील सानेगुरुजी विद्यालय एसएससी (SSC) बोर्डामार्फत मार्च परीक्षा 2024 केंद्र क्रमांक 5105 कुरुंदवाड या केंद्रावरती दक्षता समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.निवडीबद्दल इचलकरंजी सन्मती बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ.आप्पासो होसकल्ले व प्रा.ए.जे.पाटील यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बँकेचे बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार,मुख्य शाखेचे मॅनेजर शरद कांबळे ,रुईचे शाखाधिकारी रोहित बडबडे,आळते शाखाधिकारी विनायक घोरपडे,आयटी मॅनेजर सोमनाथ कुंभार, असि.आयटी मॅनेजर अनंत गिरमल,यांच्यासह सर्व बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.