दानोळीत ओटी भरून महिलांनी घातले देशी गाईचे डोहाळे जेवण 

Spread the love

दानोळीत देशी गाईची ओटी भरून महिलांनी साजरे केले डोहाळे जेवण

देशी गायीचे जतन करण्याचा दिला संदेश

शिरोळ / प्रतिनिधी

दानोळी (ता.शिरोळ) येथील यशवंत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जि.उपाध्यक्ष दादासो गावडे यांनी आपल्या देशी गाईची ओटी भरणी केली व डोहाळे जेवण देखील करण्यात आले.गावडे यांनी काही दिवसांपूर्वी देशी गाईची कालवड घेतली होती.ती सध्या गाभण असल्याने तिचे डोहाळे जेवण करण्याची इच्छा कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली.त्याला दादासो यांनीही संमती दिली.
जवळपास १५० लोकांसाठी डोहाळे जेवणाचा गोडधोड बेत आखण्यात आला.मंडप उभारण्यात आला.सुहासिनी महिलांनी गाईचे औक्षण केले.परंपरेप्रमाणे पूजन करीत, ओटी भरण्यात आली.व डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.हिंदू संस्कृतीमध्ये असे म्हटले जाते की गाई म्हणजे 33 कोटी देवतांची माई आहे.हिंदू संस्कृतीमध्ये देशी गाई सर्वोच्च स्थानी आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने देशी गाय महत्त्वाची भूमिका बजावत असते.देशी गायीचे दूध,लोणी,तूप इत्यादी आरोग्यासाठी लाभदायक असते.देशी गायीचे गोमूत्र देखील जंतुनाशक असते.यामुळे देशी गाई ही आरोग्य जननी म्हणून ओळखली जाते.दरम्यान उत्पन्न वाढीसाठी पशुपालनामध्ये पाश्चात्य पशुंचा शिरकाव झाला आहे. यामुळे देशी गाई लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.पण दादासो गावडे याला अपवाद ठरले आहेत.देशी गाईंचे आरोग्यासाठी असलेले लाभ लक्षात घेता,तिचे संवर्धन व जतन करण्यात यावे असा संदेश त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे.

error: Content is protected !!