कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड पोलीस प्रशासनाने फॅन्सी नंबर प्लेट, दादा, मामा,बाबा,आणि तणावनिर्माण होईल असे स्लोगन आणि फोटो असणाऱ्या नंबर प्लेटवर कारवाई करत एकदिवसात २७ हजाराचा दंड वसूल केला.तर काहींना वादग्रस्त नंबर प्लेट बाबत दंड आकारून समज नोटीस देऊन सोडून दिले.पोलीस प्रशासनाच्या या कारवाईने शहर व परिसरात वाहनधारकातुन खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनाने वाहनांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतल्याने दिवसभर शासन नियमाच्या नंबर प्लेट तयार करण्यासाठी रेडीयम दुकानात दिवसभर गर्दी केली होती.कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सागर खाडे,नागेश केरीपाळे,फारूक जमादार,ज्ञानदेव सानप,शिरीष कांबळे यांची पाच पथके तयार केली आहेत.सदरचे पथक सोमवारी दिवसभर ई चलन डिव्हाइस आणि स्पंनर सेट(पाना)स्क्रू ड्रायव्हर घेऊन तैनात होते.फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने दिसताच त्यांना अडवून फॅन्सी नंबर प्लेट जागेवर उतरवल्या.संबंधित वाहन क्रमांकावर पूर्वी फॅन्सी नंबर प्लेट बाबत चलन आहे का,याची प्रथम पडताळणी केली.पहिली कारवाई झालेली नसेल तर फॅन्सी नंबर प्लेट लावल्या बाबत ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली.एकदा दंडात्मक कारवाई करूनही फॅन्सी नंबर प्लेट न बदलेली वाहने पोलिसांना मिळून आल्या नंतर त्या वाहनधारकाकडून १५०० रुपयांचा दंड वसूल केला.या कारवाईत चार चाकी वाहनांच्या नंबर प्लेटची तपासणी करून ४५ वाहनांच्या नंबर प्लेटावर कारवाई केली.या कारवाईदरम्यान नो पार्किंग झोन मध्ये वाहन पार्किंग करणे सिग्नल तोडून जाणे याबाबतची महिती ई चलन डिव्हाइसवर निदर्शनास आल्यानंतर सदर दंड वसूल करण्यात आला.