छ.शिवाजी महाराज की जयच्या घोषात शिरोळ शहरात शिवजयंती साजरी

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषात शिवजयंती साजरी
रक्तदान सामाजिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन अवघे शहर भगवेमय

शिरोळ / प्रतिनिधी

जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषात आणि शिव पोवाड्याच्या निनादात शिरोळ परिसरात सर्वत्र उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनी रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले होते.सायंकाळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते
शिरोळ शहरात पहाटेपासूनच शिवजयंती सोहळा सुरू झाला स्पीकर स्टेरिओ यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीचे पोवाडे वाजत होते सडा रांगोळी करून सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले होते.येथील पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजन करून विविध मान्यवरांनी अभिवादन केले.येथील शिवाजी तक्त येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराराणी यांच्या गादीचे पूजन करण्यात आले.यानंतर शहरातील वारकरी संप्रदायाचे कीर्तन झाले.दुपारी बारा वाजता शिव जन्मकाळ सोहळा संपन्न झाला त्यानंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.सायंकाळी मानाची जय भवानी तोफ पारंपारिक वाद्य हलगी तुतारी ढोल ताशा या वाद्याच्या निनादात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा वेशभूषा परिधान केलेले तरुण यासह छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी व प्रतिकृतीची भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली.जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय चा अखंड जयघोष मिरवणुकीत होता.शहरातील सर्व शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालय बँका सहकारी संस्था या ठिकाणीही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील विविध सार्वजनिक तरुण मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती व प्रतिमा यांचे पूजन केले.जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रम पार पडले तसेच शिवभक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.रस्त्याच्या दुतर्फा गल्लीबोळात भगवे ध्वज फडकवण्यात आले होते.त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.सायंकाळी काही तरुण मंडळांनी सुद्धा मिरवणुकीचे आयोजन केले होते.डॉल्बीच्या दणदणामध्ये उपनगरातील मिरवणुका निघाल्या तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंतीचे नेटके व दिमाखदार संयोजन केले होते.

error: Content is protected !!