औरवाड पाणवठ्यावरुन वाळू तस्करी : महसूल विभागाची कारवाई
औरवाड पाणवठ्यारून गावातील युवकांकडून रात्री उत्खनन केलेली अंदाजे १२ ते १३ ब्रास वाळू महसूल विभागाने जप्त करून तहसील कार्यालयात जमा केली. या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यामध्ये भिती पसरली असून महसूल पथकाने दुसऱ्यांदा कारवाई केल्याने महसूल विभागाचे कौतुक होत आहे.कृष्णा नदीच्या पाणी पातळीत थोडी कमी झालेचा फायदा घेऊन अज्ञात लोकांकडून रात्री १२ नंतर पाण्यात बुडुन वाळू उपसा केला जात होता, याबाबतची माहिती शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळताच त्यांनी नृसिंहवाडी मंडळ आधिकारी अमितकुमार पडळकर व औरवाडचे अतिरिक्त चार्ज असलेले तलाठी सदाशिव निकम यांच्या पथकाने सोमवारी पहाटे पाच वाजलेपासून चोरून एकत्र केलेली अंदाजे १२ ते १३ ब्रास वाळू जप्त करून ट्रॅक्टरच्या
सहाय्याने तहसील कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आली. सदरच्या कारवाई पथकामध्ये नृसिंहवाडी मंडळ आधिकारी अमितकुमार पडळकर,तलाठी सदाशिव निकम,सुरेश भानुसे,कोतवाल शिवाजी गंगाधर,महेश
शेडबाळे यांचा समावेश होता.