Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

पारंपारिक राजेशाही वेशभूषेत कुरुंदवाड शहरातील शेकडो मावळ्यांनी आणि युवतीसह रणरागिनीने छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव पाळण्याला घेऊन येतील शिवतीर्थ असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पायाला दुग्धाचा अभिषेक करून शिवरायांच्या जयघोषात अत्यंत आनंद उत्सवात शिवजयंती साजरी केली.दरम्यान नगरपरिषद,मराठा समाज मंडळ,विद्यालय,महाविद्यालय व सामाजिक मंडळासह परिसरात रॅली सह अदि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

 

येथील पालिका सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे कार्यालय निरीक्षक पूजा पाटील, योगेश गुरव,नंदकुमार चौधरी, शशिकांत कडाळे,विनायक दळवी,अमोल कांबळे, अभिजीत कांबळे,रिजवान मतवाल आदी उपस्थित होते.

 

येथील मराठा मंडळ कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रतिमेला रामदास मधाळे,ममतेश आवळे,अजित देसाई,रामचंद्र मोहिते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महिपती बाबर,नंदकुमार पाटील,कृष्णा नरके,आनंदा शिंदे अदि उपस्थित होते.

 

येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल,दत्त महाविद्यालय,जिल्हा परिषद शाळा,सैनिकी पॅटर्न निवासी शाळा तर्फे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून रॅली काढणयात आली होती. रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ यांचे वेशांतर करून विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीत संस्थेची चेअरमन प्रा शरदचंद्र पराडकर,मुख्याध्यापकसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

शिवहिंद मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे,दयानंद मालवेकर,सुनील कुरुंदवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मिलिंद गोरे, पिंटू खराडे,हिंदुराव खराडे,प्रा.डी.वाय.चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शिवजयंती निमित्त कुरुंदवाड पोलीस प्रशासनातर्फे कार्यक्षेत्रातील सर्वच गावात राखीव पोलीस दलाचे कुमक मागवून बंदोबस्त लावण्यात आला होता.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी सर्व गावात पेट्रोलिंग सुरू ठेवले होते.

error: Content is protected !!