निखिल वागळे यांच्यावर भ्याड हल्ला केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे खंबीर पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भ्याड हल्ला केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल कराव अशा आशयाची मागणी दलित मित्र संपादक विश्वास कांबळे यांनी शिरोळचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निखिल वागळे पुरोगामी विचाराचे पत्रकार आहेत न्यायाची न्यायाची चा, अन्यायाची चीड, लढण्याची धमक त्यांच्यात आहे.त्यामुळे ते परखड बोलतात,परखड लिहितात,पुरोगामी विचार जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.देशासह महाराष्ट्रामध्ये पुरोगामी वर हल्ला चढविला जात आहे.त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला आहे.अशा वेळी वैचारिक प्रबोधन गरज आहे .ही गरज ओळखून निखिल वागळे यांचे पुण्यामध्ये व्याख्यान आयोजित केले होते.यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे.हा हल्ला निखिल वागळे यांच्यावर नसून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ वर आहे.याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. याची चौकशी होऊन भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कांबळे यांनी केले आहे.मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवीत असल्याचे आश्वासन निवासी नायब तहसीलदार जमदाडे यांनी दिले.यावेळी जेष्ठ नेते खंडेराव हेरवाडे, उत्तम वागवेकर ,राजेंद्र प्रधान हे उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता कुरुंदवाड पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले.यावेळी जयपाल बलवान,गौतम कांबळे,मुजाहिद पटेल उपस्थित होते.

error: Content is protected !!