बिद्री निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतल्या वैयक्तिक भेटी

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

श्री दूधगंगा-वेधगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी

भारतीय जनता पार्टीचे नेते व बंगाल केमिकलचे भारत सरकारचे संचालक डॉ.संजयदादा पाटील यांच्या शिरोली येथील संपर्क कार्यालयाला भेट देऊन

विविध लोकांशी चर्चा केली.यावेळी बिद्रीच्या निवडनूकीनिमित्ताने सरवडे, कासारपुतळा,कासारवाडा,बिद्री,गारगोटी, अर्जुनवाडा,सुळंबी,सोळांकुर,पुष्पनगर,अशा बऱ्याच गावातून बिद्रीच्या संबंधित मतदार

आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक चंद्रकांतदादा पाटील यांनी वैयक्तिकरित्या घेतली.काही नाराज मंडळीना निश्चितपणे भारतीय जनता पार्टी तुमच्यासोबत राहील,या निवडणुकीला आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रणित

पॅनलला मतदान करावं आणि विजय करावा अशा प्रकारचे आवाहन ही पाटील यांनी केले.या निमित्ताने सर्व मंडळींनी दादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बिद्रीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पॅनल निवडून

आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले.यावेळी प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव अँड.सुशात संजय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!