डॉ.मनोहर कोळी यांना आदर्श सेवा रत्न पुरस्कार जाहीर

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर येथून सेवानिवृत झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक व अन्यायग्रस्त कोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे आदर्श व्यक्तिमत्व डॉ.मनोहर दादू कोळी यांना सीबीएस न्युज मराठी आयोजित ५ व्या राज्यस्तरीय “आदर्श सेवा रत्न” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनेक सन्माननीय मान्यवरांची माहिती प्राप्त झाली होती.त्यातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय अशी दखलपात्र कामगिरी पाहून निवड करण्यात आली आहे.सदर पुरस्कार रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सांगोला येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.सदर पुरस्कार जाहीर झालेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!