“मोठी बातमी” कुरुंदवाड येथील खुनाचा उलगडा

कुरुंदवाड / प्रतिनिधी

सांगली येथील संतोष कदम हत्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री 2 संशयित युवकांना अटक करण्यात आली आहे.एकजण चाकूसह फरारी आहे.कदमशी संशयित आरोपीला महापालिकेत नोकरी लावण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला होता.यातूनच कदम याची हत्या करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.याप्रकरणी अटक करण्यात आलेली नितेश दिलीप वराळे(वय.30),सुरज प्रकाश जाधव (वय.20,दोघे, रा.सिद्धार्थ परिसर,सांगली) अशी नावे आहेत.यातील तिसरा संशयित आरोपी तुषार भिसे हा फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णु कदम (वय 36 रा.गावभाग सांगली) याचा धारदार चाकूने वार करुन खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्वीफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला.खून करुन हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते.संशयीत आरोपी नितेश वराळेला सांगली महानगरपालिकेत नोकरीस लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झाला होता.नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदमकडे पैशाचा तगादा लावला होता.10 ते 12 दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता. कदमने गुरुवारी पैसे देण्याचा वायदा केला होता.पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने भोकसून वर्मी घाव घालून कदमची हत्या केली.आणि वाहनासह मृतदेह नांदणी रस्त्यावर सोडून तिघांनी पलायन केले.संशयित आरोपी वराळे आणि जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर भिसे हा फरार आहे.दरम्यान या खुनाची व्याप्ती वाढत चालली असून याध्ये आणखीन काही घटना सांगली जिल्ह्यातील संशयित आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
Spread the love
error: Content is protected !!