इंगळी / प्रतिनिधी
कागवाडहुन उगार साखर कारखान्याकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडेला पलटी झाल्याने रस्त्याच्या बाजूस जाणारे तीन शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे घटनास्थळी नागरिकांनी जखमी महिलांना बाहेर काढले, ही दुर्घटना कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथे दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,कागवाडहुन उगार साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक ka,71 T,1925 चा ट्रेलरचे चाक तुटून टेलर उलटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजूर महिला चंपा लखाप्पा तळकट्टी (वय,42), भारतीय वडराळे (वय 38 ), मालू रावसाहेब ऐनापुरे( वय 53 ) या तिघी जागीच ठार झाल्या तर शेकवा नरसप्पा नरसाई ( वय,45) या गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.शेतातून काम करून घरी परतणाऱ्या महिलांवर घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे कागवाड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी कुटूंबाचा आक्रोश हृदय पेटळवणारा होता.अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.अपघात घडल्याचे लगेच समजताच नागरिकांनी लगेच जेसीबी मागवून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिघेही मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले.सदर घटनेची नोंद कागवाड पोलिसात झाली असून उपनिरीक्षक एम बी बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान आमदार राजू कागे यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघातातील दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मयतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.