अन्यथा कृष्णा योजनेचा पाणी पुरवठा बंद करून टाळे ठोकणार

Spread the love
कुरुंदवाड / प्रतिनिधी
पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलाजवळील इचलकरंजी कृष्णा-पाणी योजनेच्या बंद असलेल्या पाईपलाईनला जलपर्णी प्रत्येकवर्षी तुंबून नदीला विळखा पडतो.सदर बंद अवस्थेत असलेली पाईप लाईन नदीत पाणी पातळी कमी झाली आहे.तोपर्यंत येत्या आठ दिवसात काढून घ्यावी अन्यथा कृष्णा योजनेचा पाणी पुरवठा बंद करून येथील केंद्राला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी पत्रकार बैठकीत दिला.
बैठकीत जिल्हाप्रमुख उगळे पुढे म्हणाले पंचगंगा नदीला जलपर्णी ही प्रत्येक वर्षीची समस्या आहे.कोल्हापूरहुन जलपर्णी प्रवाहित होऊन शिरढोण पुलापर्यंत येते. शिरढोण पुला जवळ कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनला येऊन तटते मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही जलपर्णी जठील होऊन जाळे निर्माण होते.जून महिन्यातील पावसाच्या पाण्याने सदरची जलपर्णीचे जाळे सूटत नाही ते पाण्यासोबत पुलाला तटते आणि नदीकाठच्या शेतीत विसावते.यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने 2 वर्षांपूर्वी  पंचगंगा नदीपात्रातून दुसरी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पाईपलाईनला भविष्यात जलपर्णी तटू नये या दृष्टिकोनातून ती नदीच्या खडकात चर मारून बसविण्यात आली आहे.मात्र बंद अवस्थेतील जुनी पाईपलाईन तशीच ठेवल्याने जून महिन्यात जलपर्णी तुंबली होती.
पाणी पातळी वाढल्याने शिरढोन पुलावरून पाणी वाहू लागल्यानंतर जलपर्णी प्रवाहित झाली.पाईप लाईन अशीच राहिली तर पुन्हा जलपर्णी तुंबणार आहे.त्यामुळे इचलकरंजी महापालिकेने पाईप लाईन काढून घ्यावी.अन्यथा मजरेवाडी हद्दीतील कृष्णा नदी जकवेल केंद्राचा वीज पुरवठा बंद करून कार्यालयाला टाळे ठोकू असे उगळे यांनी सांगितले.यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर,आप्पासाहेब भोसले, सुहास पासोबा, राजू बेले, गणेश अनिकेत बेले आदी शिवसैनिक उपस्थित होते.
error: Content is protected !!