गाऊट अर्थरायटिस करा टोटल कमी..!

अति तिखट,खारट,क्षारीय पदार्थ खाल्यामुळे रक्तातील “युरिक ॲसिड”चे प्रमाण वाढते व सांध्याचा त्रास सुरु होतो यालाच गाऊट अर्थरायटिस म्हणतात.

लक्षणे –
सांध्यांना सूज येणे, दुखणे, टोचणे, भगभगने, अंगाला खाज सुटणे, ताप हि सामान्य लक्षणे आढळून येतात.

तपासणी – URIC Acid.
येथे वात व कफ मेदामुळे रक्तदूष्टी होते.

अपथ्य (काय खाऊ नये )-
वात व रक्त दुष्टी करणारे पदार्थ,उसाचा रस, टोमॅटो,पापड, लोणचे, उडीद, हरभरा, बटाटा, रताळी, दही, पालेभाज्या,भेंडी मसूर, सर्व डाळी, नॉनव्हेज.

पथ्य (काय खावे )-
दुधीभोपळा, काळे मनुके, पडवळ, दोडका, काकडी, बिट, गाजर, ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, कारले, गवारी, घेवडा, लाल भात, ज्वारीची भाकरी, मूग डाळ, लिंबू, पेरू, सफरचंद, डाळिंब.

आयुर्वेदिक उपचार –
विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, स्नेहन, स्वेदन

आयुर्वेदिक औषधी –
अमृता गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, महा मंजिष्टादी काढा. गुडूची घनवटी, मध.

उपाय –
1) राग, उपवास, अतीव्यायाम, जास्त खाणे अशा गोष्टी करू नये.
2) कोकिलाक्ष, त्रिफळा, मंजिष्टा, गुडूची यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व रात्री 2चमचे 1वाटी गरम पाण्यातून पिणे.
3) प्रॉपर झोप घ्यावी.
4) पिंड तेल /खोबरेल तेलाने शरीराला मालिश करावी व नंतर दशमूळ काढ्याच्या वाफेने (नाडी स्वेदन )शेक घ्यावा.
5) काळ्या वाळूचा शेक व पोट्टली (औषधी पुरचुंडीचा) शेक घ्यावा.
6) शिरावेध पद्धतीने नीडल लावून 20-30ml रक्त काढून द्यावे.
7) दररोज सफरचंद,लिंबू, काकडी दररोज आहारात घ्यावे.
8) अहिर भैरव, रोहिणी भैरव हे दोन्ही पद्धतीचे राग एकावेत असे संगीत चिकित्सा मध्ये नमूद आहे.
9) दररोज काळे मनुके व काळी तुळशीचे 5पाने खावीत.
10) सेतूबंधासन, वज्रसन,भुजंगासन,अंजनेयासन,
कुक्कुटासन,हे 5योगाभ्यास नियमित पने करावेत.
11) साध्या मिठाऐवजी, सैंधव मीट खावे.
12) मोरिंगा टॅबलेट दिवसातून 2वेळा घ्यावे, यामुळे सूज कमी येते.

गाऊट अर्थरायटिस योग्य उपचार न झाल्यास त्यामुळे काही नवीन आजार तयार होतात, त्यामुळे गाऊट अर्थरायटिस वर वेळेवर उपचार गरजेचे आहेत

गाऊट अर्थरायटीस मुळे उत्पन्न होणारे आजार –
1) किडनी विकार.
2) हृदय विकार
3) त्वचा रोग

डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च, सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340

Spread the love
error: Content is protected !!