कुरुंदवाड / प्रतिनिधी
गत वर्षाच्या महाराष्ट्र केसरी नंदा बागडीला हरवून अमृता पुजारीने महाराष्ट्र केसरी पद मिळवले आहे.हे कौतुकास्पद आहे तीन वेळा महाराष्ट्र केसरी पद मिळवले तर महाराष्ट्र पोलीस दलात सरळ डीवायएसपी पद मिळते ते अमृताने मिळवावे अशी इच्छा कुस्ती समालोचक शंकर पुजारी यांनी व्यक्त केली.त्यावेळी त्यांनी कुस्तीचा इतिहास कथन केला.त्यांचे हस्ते पैलवान अमृता पुजारी हिला चांदीचे गदा व अकरा हजार एक रुपये देऊन सत्कार करण्यात आला.हा सत्कार शिरोळ तालुका धनगर समाजाने आयोजित केला होता.अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर होते.पुजारी पुढे म्हणाले महाराष्ट्र कुस्ती परिषदेची स्थापना 1953 ला झाली श्रीपती खसनाळे यांनी 1959 ला पहिले हिंदकेसरी पद मिळवले त्यांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे असते बक्षीस देणे आले होते.1952 ला खाशाबा जाधव यांनी पहिले कुस्तीत पदक मिळवले होते.साक्षी मलिक हिने कुस्तीमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक मिळवले होते.कुस्तीमध्ये आत्मबळ, मनोबल, शरीरबल लागते.सर्व बलांचे एकत्रिकरण म्हणजे कुस्ती होय.यावेळी बोलताना कुस्ती वस्ताद दादा लवटे म्हणाले.मुरगुडला सदाशिव मंडलिक तालीम आहे त्यामध्ये अमृता २०२० ला अमृता दाखल झाली अमृताने कमी वयात महाराष्ट्र केसरी पद मिळवले आहे हे कौतुकास्पद आहे.भविष्यात ती शिरोळ तालुका व कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राचे नाव मोठे करेल.
नारायण मोठे देसाई सेवानिवृत्त पोलीस उप-अधीक्षक यांचे यावेळी भाषण झाले.यावेळी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज मंडळाचे अध्यक्ष अशोकराव कोळेकर म्हणाले शिरोळ तालुका हा सधन तालुका आहे. भविष्यात काही मदत कमी पडू देणार नाही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धनगर समाज तिच्या पाठीशी आहे. शिक्षणाला व चांगल्या कामाला धनगर समाज नेहमी पाठीशी राहतो.कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे व मी वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही दोघे समाजासाठी एकत्र येतो चांगल्या कामास आमचे नेहमीच मदत असते.समाजाचे आपण देणे लागतो या हेतूने आम्ही समाजाची नाळ सोडलेली नाही.आमचा बहुतांश पैसा समाजासाठी खर्च करतो.यावेळी उद्योगपती कोळेकर यांनी अमृतास 51 हजार रुपयाची व्यक्तिगत देणगी दिली.यावेळी राष्ट्रीय खो खो खेळाडू प्रीती धनगर (कवठेसार)हिला पाच हजार एक रुपयाची देणगी देण्यात आली तर हेरवाड येथील जिल्हास्तरीय मलखांब खेळाडू श्रेयस देवाचे यास एक हजार एक रुपये देऊन गौरवण्यात आले.यावेळी शिरोळ तालुक्यातील विविध गावच्या धनगर समाजानी व व्यक्तीनी अमृता मदत स्वरूपात देणगी दिली.यावेळी अण्णासाहेब पुजारी बाबासाहेब पुजारी विष्णू शंकर गावडे उदय डांगे रणजीत डांगे आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक रविकुमार पाटील यांनी केले. आभार माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी मानले.