सौ.रू.पा.माने कन्या माध्यमिक विद्यालय विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव द्वारा आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये येथील सौ. रुक्मिणी पांडुरंग माने (रहमतपुरकर) कन्या माध्यमिक विद्यालय शिरोळ या विद्यालयातील विद्यार्थिनींनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला.
विद्यालयातील विद्यार्थिनी आराध्या अमृत हेरवाडे हीने जिल्ह्यात प्रथम तर अमृता युवराज कोळी हिने द्वितीय क्रमांक मिळवत सुयश संपादन केले.सदर विद्यार्थिनीना विद्यालयाचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रमुख एस एन चौगले तसेच मुख्याध्यापिका सौ. पी ए हेरवाडे व सर्व शिक्षक वृंद व पालकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले

error: Content is protected !!