उदं…ग आई उदं..यल्लमाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सौंदत्तीला बैलगाड्या रवाना

Spread the love

कुरुंदवाड /  प्रतिनिधी

उदं…ग आई उदं..यल्लमाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेला येथील रेणुका देवीच्या पालख्या,बैलगाड्या असंख्य भक्तांच्या सोबतीने हलगी- खेताळाच्या निनादात भक्तिमय वातावरणात रवाना झाल्या.

 

कुरुंदवाड शहरातून सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेला बैलगाडीने व पायी चालत जाण्याच्या 105 वर्षांपासूनची परंपरा आहे.कै.गणपतराव पोमाजे यांनी शहररातील बैलगाड्यांची संख्या वाढवून या यात्रेला मोठे स्वरूप निर्माण करून दिले आहे.ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे.

 

गुरूवारी 25 तारखेला कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी येथील यल्लमा देवालयातून फुलांनी सजविलेला देवीची पालखी मिरवणुकीने सोमवारी रवाना झाली आहे.या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरातून रेणुकादेवीच्या पालखी सोबत 12 बैलगाड्या आणि भक्तगणांचा पायी प्रवास सुरू झाला आहे.

 

यात्रेसाठी धनपाल पोमाजे,अण्णाप्पा आवळे,दीपक पोमाजे,सखाहरी आवळे,संतोष बागलकोटे,काशिनाथ माळी,दादा सावगावे,सुरेश ठोंबरे,शाहीर आवळे,राजू साळुंखे,धनाजी तोडकर,मारुती डवरी,शालन आवळे, दिलीप आवळे,माजी नगरसेवक राजू आवळे यांनी आपल्या बंदा रुपया बैलगाड्या सजवून बैलांच्या अंगावर झूल घालून यात्रेसाठी रवाना झाले आहेत.

 

कुरुंदवाड ते सौंदत्ती यात्रेचा 150 किलोमीटरचा पायी प्रवास आहे.चिक्कोडी,गोकाक,मनोळी ते सौंदत्ती या ठिकाणी तिसऱ्या दिवशी वस्ती आहे.नऊ दिवसांचा प्रवास असून पाचव्या दिवशी पहाटे ही यात्रा परतीच्या प्रवासाला लागणार असून नवव्या दिवशी कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे दुपारी रेणुकादेवीच्या जगाचे आगमन होणार आहे.

 

यात्रेसाठी यल्लमा देवालयाचे पुजारी रावसाहेब चव्हाण अमृत चव्हाण अमोल चव्हाण सौ लता चव्हाण,राजू आवळे,आयुब पट्टेकरी,दादासाहेब गायकवाड,मुन्ना बागवान,बेबी पट्टेकरी,सुरज पट्टेकरी,सह आदी भक्तगण मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.

error: Content is protected !!