सततची सर्दी अशी करा दूर!
नाकातील श्लेष्मल त्वचेचा दाह म्हणजेच “सर्दी /पडसे “होय.धुळीची ऍलर्जी, थंड हवेत राहणे, सारखे फ्रिज मधील /थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे सतत सर्दी राहते.
लक्षणे –
डोकं गच्च होणे, सतत नाक गळणे, नाकातील मांस /हाड वाढणे, आवाजात बदल होणे, घसा दुखणे, नाक चोंदणे हि सर्व लक्षणे आढळतात.
तपासणी – CT scan CNS
रक्त तपासणी – ESR, CBC
अपथ्य (काय खाऊ नये )-
कफकारक आहार, दही, ताक, वांगी,टोमॅटो, केळ,फ्रिज मधील पदार्थ, फणस,मसालेदार -तेलकट पदार्थ,पनीर,नॉनव्हेज, थंड पाणी,पापड, लोणचे,कोल्ड्रिंक.
पथ्य (काय खावे )-
लसूण, कांदा, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, ज्वारीची भाकरी, ज्वारीच्या कण्या,दुधीभोपळा, पडवळ, दोडका, पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, ढबू मिरची, शेवगा, घेवडा, मूग डाळ, भात, भेंडी, गवारी.
आयुर्वेदिक उपचार – वमन, लंघन, शिरोबस्ती, रक्तमोक्षण
आयुर्वेदिक कल्प –
लक्ष्मी विलास रस, चित्रक हरितकी अवलेह, सितोफलादी चूर्ण, त्रिभुवन कीर्ती रस.
उपाय –
1) सकाळी व रात्री झोपताना “पंचगव्य नस्य ” दोन्ही नाकपुड्यात 2 थेंब सोडणे.
2) गरम पाण्यात अमृतधाराचे काही थेंब टाकून वाफ घेणे.
3) बाहेरून जाऊन आल्यावर गुळण्या करणे यामुळे घश्याचे संरक्षण होते.
4) AC/फॅन टाळणे.
5) धुळीपासून स्वतःचे रक्षण करणे (बाहेर फिरताना मास्क /रुमाल बांधणे)
6) दररोज काळ्या तुळशीची 5पाने खाणे.
7) जेवनामध्ये आले /सुंठेचा वापर करणे.
8) थंड पाण्याऐवजी, कोमट पाणी पिणे
9) ईम्युनिटी वाढण्यासाठी लसूण व हळद घालून दूध गरम करावे व ते दूध प्यावे.
10) हरिद्राखंड, गोदंती भस्म, सितोफलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण, अभ्रक भस्म,रस सिंधूर हे सर्व एकत्रित करून मधासोबत सकाळी व संध्याकाळी चाटण करावे.
11) नाक सतत चोंदत असल्यास नाकाभोवती निलगिरी तेल थोडेसे लावावे /रुमालात काही थेंब निलगिरी तेलाचे टाकावे.
12) भीमसेनी कापूर, भाजलेली मोहरी रुमालात घालून चेहऱ्यावर शेकावे
13) वेखंड पावडर नियमितपने सेवन केल्याने सर्दीमुळे डोके गच्च होत असल्यास तो त्रास कमी होतो.
14) कपाळावर वेखंड, सुंठ, जायफळ हे सर्व पाण्यात उगाळून याचा लेप कपाळावर लावावा, यामुळे सुद्धा चांगला फरक पडतो.
15) बाम भस्त्रिका,भुजंगासन,पवन मुक्तासन,वज्रसन हे योगाभ्यास नियमितपने करावेत.
16) ॲक्युपंक्चर करून घ्यावे,यात आरोमा थेरपी सुद्धा इफेक्टिव्ह आहे.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340