‘सृजनानंद’ हे हस्तलिखित प्रकाशन : राष्ट्रीय विद्यालयात पहिले ‘बालकुमार साहित्य संमेलन’
जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी संचलित तमदलगे ता. शिरोळ येथील राष्ट्रीय विद्यालय येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला.प्रमुख पाहुण्या म्हणून जयसिंगपूरच्या प्रसिद्ध साहित्यिक सौ नीलमताई माणगांवे व साहित्यिक प्राध्यापक डॉ.विनोद कांबळे उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिक संघटना जयसिंगपूर चे अध्यक्ष बी.बी.गुरव सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डी.आर.खामकर होते.तर संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार, सचिव दत्तात्रय कदम,संचालिका सौ.अंजली पवार,विद्यालयाचे सदस्य रवींद्र भोसले व तमदलगे सरपंच धनाजी नंदीवाले उपस्थित होते.
प्रारंभी ग्रंथ पूजन करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.या बालकुमार साहित्य संमेलनात विद्यालयातील एकूण दहा बालकवींनी सुंदर कविता सादर केल्या.तसेच पाच बालकथाकारांनी आकर्षक कथा सादर केल्या.सहा.विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्त्व याविषयी परिसंवाद घडवून आणला.विद्यालयातील सर्व शिक्षकांनीही कविता सादर केल्या.पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून समर्थ जगदाळे या विद्यार्थ्याने उपस्थितांचे स्वागत केले.तर संमेलनाध्यक्ष म्हणून कुमारी जिज्ञासा पुजारी या विद्यार्थिनीने सर्व मान्यवरांचे आभार मानले.प्रमुख पाहुण्या सौ नीलमताई माणगावे व विनोद कांबळे यांनी काव्य,कथा व परिसंवाद सादर केलेल्या सर्व बालकवी सहित्यिकांचे कौतुक केले.त्यांनी प्रकाशित केलेली काही पुस्तके विद्यार्थ्यांना व शाळेसाठी भेट स्वरूपात दिली.यावेळी पाहुण्यांचे हस्ते ‘सृजनानंद’ या हस्तलिखितचे प्रकाशन करण्यात आले.बी.बी.गुरव यांनी विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.दुसऱ्या सत्रात वार्षिक पारितोषिक वितरण पाहुण्यांच्या हस्ते झाले.गुणवंत विद्यार्थी व थांगता या मार्शल आर्ट स्पर्धेतील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळात यश संपादन केलेल्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावर्षीचा विद्यालयातील आदर्श विद्यार्थी म्हणून श्रीवर्धन संजय शिंदे याचे व आदर्श विद्यार्थिनी म्हणून नमिता भाऊसो पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी केले.सूत्रसंचालन श्री. वर्धमान माणगांवे यांनी केले. आभार सौ.सुनिता साळुंखे यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,माजी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.