‘या’ लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का?

Spread the love
आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात रंगली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सडकून टीका केली होती.यानंतर त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा दौरा होत असल्यानं हा वाद मिटवणार का,याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का ? याचीही चर्चा आहे.महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूर आणि हातकणंगलेवर ठाकरे गटाने दावा केला आहे.हातकणंगलेची जागा स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना सोडणार असल्याची चर्चा आहे.
error: Content is protected !!