राजू आडके राज्यस्तरीय ‘कला गौरव’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथील सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ राजू उर्फ कृष्णात आडके यांना मैत्रीय सेवा प्रतिष्ठान सिंहगड पुणे यांच्यावतीने सन २०२३-२४ या वर्षाचा ‘कला गौरव’राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

मैत्रीय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.पट्टणकोडोली गावचे सुपुत्र व गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे हून अधिक प्रयोग करून संमोहन क्षेत्रातून सेवा देणाऱ्या

 

व आपल्या सेवेतून अनेकांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवणारे, लोकांचे खळखळून मनोरंजन करणारे राजू उर्फ कृष्णात आडके यांना संमोहन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, मैत्रीय सेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने सिंहगड पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात

 

सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी आशा भट, प्रतिभाताई धंगेकर, प्रियंका निकम, दिप्ती चौधरी श्री व सौ उत्तम सोकासने राधानगरी तसेच मैत्रीय सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!