अन्यथा क्रांती चौकात पोलीस ठाण्याच्या विरोधात आंदोलन संभाजी ब्रिगेडचा इशारा

Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकात वाहतूक पोलिसाची कायमस्वरूपी नेमणूक करावी.अन्यथा क्रांती चौकात पोलीस ठाण्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने जयसिंगपूर
पोलिसांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.येथील क्रांती चौकात वाहतूक कोंडी नित्याचे बनली आहे.तेथे असणारे पोलीस कर्मचारी सध्या अन्य ठिकाणी कार्यरत असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.तसेच शिरोळ रोडवर सर्व शाळा,कॉलेजेस असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ क्रांती चौकातील या शिरोळ रस्त्यावर असते.त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.तरी लवकरात लवकर क्रांती चौकात वाहतूक नियंत्रक पोलिसांची नेमणूक करावी.अन्यथा क्रांती चौकात जयसिंगपूर पोलीस ठाणे विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शिरोळ तालुका अध्यक्ष अक्षय पाटील व माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांच्यासह आहेत.निवेदन सादर करते वेळी माजी नगरसेवक बंडा मणियार,तानाजी जाधव, सागर चौगुले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!