श्री क्षेत्र नृसिंहवाडीस भरघोस निधी दिला जाईल – आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर

Spread the love
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
विकासाचे रोल मॉडेल बनवण्यासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी सदैव भरघोस निधी दिला जाईल दत्त भक्तांची वाढती संख्या पाहता पर्यटन व तिर्थक्षेत्र या दोन्हींची सांगड घालून विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही असे अभिवचन आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
नृसिंहवाडी येथे ४ कोटी २० लाख रुपयाच्या विकास कामाचे उद्घाटन डॉ राजेद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.ते उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी यावेळी सरपंच पार्वती कुंभार,अमोल पुजारी, रमेश मोरे,तानाजी निकम प्रमुख उपस्थित होते.आमदार यड्रावकर पुढे म्हणाले येणाऱ्या काळात भाविकांची वाढती संख्या पाहता यात्री निवास  उत्तम दर्जाचे दुचाकी व चारचाकी पार्किग व्यवस्था सुसज्ज बसस्थनक या सारख्या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीच कसर केली जाणार नाही असे ही आमदार यड्रावकर यांनी दिले. प्रास्ताविक डॉ.किरण अनुजे यांनी तर स्वागत विकास पुजारी यांनी केले.यावेळी अनघा पुजारी,सचिन जाधव, अमृत अनुजे,विकास कदम,अविनाश शिंदे,विजय आणुजे,गुरू रिसबुड,दीपक कबाडे,प्रविण आणुजे,संजय शिरटीकर,संजय गवंडी,कृष्णा गवंडी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!