कुंभोज वार्ताहर / विनोद शिंगे
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रयत शिक्षण संस्था संचलित रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज च्या संयुक्त विद्यमाने ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव २०२३ मोठ्या उत्साहात पार पडले.
रयत शिक्षण संस्थेच्या पाच एकरातील नयनरम्य व जैव विविधतेने नटलेल्या शैक्षणिक संकूलात विज्ञान व ग्रंथप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला .जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या विविध गटातील विजेते खालीलप्रमाणे
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (९ वी ते १२ वी ) :-
प्रथम क्रमांक कु.स्नेहल संजय हावलदार म्हाकवे हायस्कूल म्हाकवे उपकरण-हात नसलेल्या लोकांना
कॉम्प्युटर हाताळणी यंत्र, द्वितीय क्रमांक विघ्नेश सतिश कोपार्डे किसनराव मोरे हायस्कूल सरवडे उपकरण-आगीपासून वीजनिर्मिती , तृतीय क्रमांक शेखर शिवाजी रायजादे कुमारभवन शेळोशी भुदरगड उपकरण बँग कँरिअर, उतेजनार्थ नेमिनाथ बाहुबली बाळागिरे ताराबाई आण्णासो नरदे हायस्कूल नांदणी शिरोळ उपकरण
ऊसाचा पाला सोलणी यंत्र , कु. प्रतिक भास्कर पाटील सौ.वि.दी.शिंदे हायस्कूल गडहिंग्लज उपकरण टेक सेंट्री,उच्च प्राथमिक स्तर (६ वी ते ८ वी) :- प्रथम क्रमांक कु.तेजस प्रदिप अर्जुन महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर उपकरण बहुउद्देशीय शेतीपुरक यंत्र, द्वितीय कु.सुजय सुभाष सावंत बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूल
कौलव उपकरण शेतीयंत्र, तृतीय कु.श्रावणी अनिल शिंदे कौलव हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कौलव उपकरण आधुनिक औषध फवारणी यंत्र, उत्तेजनार्थ कु.सृष्टी राहुल फुटाणे श्री.शाहू कुमार भवन गारगोटी उपकरण
वसुंधरेसाठी नवोपक्रम, कु.श्रेया शामराव होगाडे कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर इचलकरंजी उपकरण पारंपरिक शेती.
प्राथमिक शिक्षक गट:-
प्रथम क्रमांक श्री.सतीश दिनकर कुंभार विद्या मंदिर बावेळी गगणबावडा उपकरण २२ कँरेट विज्ञान विश्व, द्वितीय श्री. शरद राजाराम कुंभार कुमार विद्या मंदिर तारदाळ उपकरण बहुउद्देशीय गणित पेटी, तृतीय श्री.उत्तम बाबासो पाटील विद्या मंदिर बलेवाडी काळम्म उपकरण जादूची पाटी
माध्यमिक शिक्षक गट प्रथम:- क्रमांक प्रियांक बाळासो पवार आदर्श विद्यानिकेतन मिणचे उपकरण रोधक व त्यांचे उपयोग , द्वितीय श्री.सुधीर पांडुरंग कांबळे शहिद जवान साताप्पा महादेव पाटील हायस्कूल बेलेवाडी मासा कागल उपकरण बहुउद्देशीय अल्पखर्चिक शैक्षणिक साधने, तृतीय श्री.प्रदिप बाबूराव व्हरकट श्रीराम हायस्कूल बावेली गगनबावडा उपकरण हसत खेळत गणित.
प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गट:- प्रथम क्रमांक श्री.निलेश गोपाळ परिट जवाहर नगर हायस्कूल इचलकरंजी उपकरण वैज्ञानिक नियमांची फिरती प्रयोगशाळा, द्वितीय श्री.इम्रानखान आसदखान जमादार उत्तुर विद्यालय उत्तुर उपकरण आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, तृतीय श्री.विजय गणपतराव पाटील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सरवडे उपकरण कचरा वेचक यंत्र.
दिव्यांग विद्यार्थी गट प्रथम:- क्रमांक कु.रिजवान रसूल सनदी धरणगुत्ती हायस्कूल धरणगुत्ती उपकरण धान्य उफणणी व निवडणी यंत्र, द्वितीय कु.प्रसाद संजय जाधव श्री.पाराशर हायस्कूल पारगाव उपकरण रस्त्यापासून मोफत ऊर्जा, तृतीय कु.ओंकार विकी पाटील गोखले विद्यालय कोल्हापूर उपकरण नदी स्वच्छता प्रकल्प.
सर्व विजेत्यांना शिक्षक आमदार मा.जयंत आसगावकर, सुरेश संकपाळ चेअरमन मुख्याध्यापक संघ, बाळ डेळेकर चेअरमन कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूर ,डॉ.एकनाथ आंबोकर माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर,जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, सरपंच जयश्री जाधव,आप्पासाहेब चौगुले
यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ.एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना पी.एच.डी मिळालेबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला तसेच विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे यशस्वी आयोजन केलेबद्दल रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार शिक्षक
आमदारांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सागर माने यांनी केले. सुत्रसंचलन सौ.प्राजक्ता पाटील व उमा जाधव यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी जि.प.कोल्हापूरचे .डी.ए.पाटील यांनी मानले.