टिप्स फॉलो करा आणि हवे तितके वजन कमी करा!!!!!
व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणे, कफकारक आहार घेतल्यामुळे, अयोग्य आहार -विहारामुळे,लठ्ठपणा वाढतो.पण प्रमाणापेक्षा जास्त वजन म्हणजे सर्व आजारांना निमंत्रणच.
कारणे –
अति प्रमाणात गोड, स्निग्ध पचायला जड असे पदार्थ, दूध व दुधाचे जड पदार्थ, नॉनव्हेज, सतत AC व फॅन मध्ये असणे, अति आरामदायक जिवनशैली मुळे “लठ्ठपणा “आजार जडतो.
लक्षणे –
वजन वाढणे, पोट वाढणे, कमरेचा घेर वाढणे, आळस येणे, शरीर बेढभ होणे, पळता न येणे, काम करायला न होणे, झोप फार येणे.
अपथ्य (खाऊ नये )-
अतिगोड पदार्थ, दूध, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, नॉनव्हेज, गूळ, उडीद, बटाटा, रताळी, मिठाई, केळी,खजूर तूप,खिर,लोणी, दही, पापड, लोणचे, कोल्ड्रिंक, ड्राय फ्रुट्स.
पथ्य (खावे )-
कारले, तोंडली, ज्वारी, बाजरी,फळभाज्या, पालेभाज्या, काकडी, बिट, गाजर, कोमट पाणी, सफरचंद, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्री, कोबी, फ्लॉवर, मूग डाळ, ताक, कांदा, लसूण, जवस, मध, राजगिरा लाडू, ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, मनुके.
आयुर्वेदिक औषधे – कांचणार गुग्गुळ, मेदोहर वटी, आमपाचक वटी,वृद्धीवाधिका वटी,त्रिफळा चूर्ण.
उपाय –
1) विरेचन व लंघन (उपवास )
2) सकाळी 1 तांब्याभर गरम पाण्यात 2 चमचे मध व 1 लिंबू पिळून, ते पाणी घ्यावे व 1 तास काही खाऊ नये.
3) सतत भूक लागत असेल, भूक कंट्रोल होत नसेल तर चिरमुरे /ज्वारीच्या लाह्या खाव्या.
4) फायटोलाक्का हे होमिओपॅथी औषध यावर गुणकारी आहे.
5) त्रिफळा चूर्ण दररोज 2 चमचे दिवसातून 2 वेळा कोमट पाण्यातून घ्यावे.
(6)महिन्यातून एकदा एरंडेल तेलाची 50ml ची बॉटल पूर्ण, कोऱ्या चहासोबत घ्यावी व त्या दिवशी आराम करावा.
7) गार्सिनिया नावाचे फळ देखील वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जाते.
8) जेवनामध्ये पुष्कळ सलाड, भाज्या व जेवनानंतर जिरे व लसूणयुक्त 1 ग्लास ताक प्यावे.
9) नित्य कोमट पाण्याचेच सेवन करावे.
10) फॅन व AC चा वापर टाळावा.
11) आठवड्यातून 3वेळा स्टीम बाथ घ्यावा.
12) पाणी बसून व एक -एक घोट प्यावे.
13) सकाळी ज्वारीच्या कन्या व संध्याकाळी लिंबू पाणी, सफरचंद नारळ पाणी, मोसंबी / संत्री घ्यावी.
14) रात्री जेवनानंतर थोडेशे चालावे, रात्रीची झोप व रात्रीचे जेवण या मध्ये किमान 2 तासाचे अंतर ठेवावे.
15) ताडासन, हस्तपादासन,पश्चिमतानासन,
पवनमुक्तासन,भुजंगासन, धनुरासन,नौकासन हे योगाभ्यास नियमितपणे करावेत.
16) ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर चा उपयोग करून घ्यावा.
17) दिवसा झोपू नये व रात्री जागरण करू नये. 18) ज्यांना शुगर आहे त्यांनी मधाऐवजी गोमूत्र अर्क पाण्यासोबत वापरावे.
टीप – वरील आयुर्वेदिक औषधे अरिहंत मेडिकल घोसरवाड येथे उपलब्ध
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340