खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता

Spread the love
कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैनिक टाकळी (जि कोल्हापूर) येथे दि.14 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ववैमनस्यातून झालेल्या खुनी हल्याची फिर्याद कुरुंदवाड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 188/2019 नुसार दादासो उर्फ बाजीराव पाटील यांच्यावर भा. द. वी. स. कलम 307,326,504,506 खाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर खटल्याची सुनावणी मे. सत्र न्यायाधीशसो जयसिंगपूर यांचे कोर्टात झाली.या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचे साक्षीदार व पुराव्यांची तपासणी झाली.आरोपींच्या वतीने ॲड.गुरुनाथ माने यांनी प्रभावी युक्तिवाद केला. ॲड.गुरुनाथ माने यांचा सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.सत्र न्यायाधीशसो श्री.जी.बी.गुरव साहेब यांनी या खटल्यातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली.सदर खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड.गुरुनाथ दिनकरराव माने व ॲड.ऋषीकेश देवाप्पा गावडे,दानोळी यांनी काम पाहिले.
error: Content is protected !!