फंगल इन्फेकशन प्रत्येक गावामध्ये ३०% लोकांना आढलतो. फंगल दिसला असता चार चौकामध्ये लोक लपवतात कारण त्याची लोकांना लाज वाटते / हिनतेची भावना उत्पन्न होते.
कारणे –
अति तेलकट -मसालेदार आहार,उष्ण,शिळे, तिकट,अंबवलेल्या पदार्थांचे सेवन करणे,घाम जास्त येणे,जागरण,केमिकल युक्त साबण,अयोग्य आहार -विहार,कफ -पित्त कारक आहार -विहार.
लक्षणे –
खाज उटणे,लाल कडा असलेले ओलसर असे चट्टे उटणे, पाणी सुटणे,लाल पाणीदार असे फोड येणे.
अपथ्य (काय खाऊ नये )-
दही,ताक,वांगी,शेंगदाणे,वाळलेले खोबरे,मुळा,अळू, पोहे, काजू,तूरडाळ,बटाटा,चहा -कॉफी,साधे मीट,लोणचे, पापड,उडीद,उसाचा रस,गूळ,कफ -पित्त कारक आहार, नॉनव्हेज.
पथ्य (काय खावे)
ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, दुधीभोपळा, पडवळ, दोडका,काकडी, बिट, गाजर, सफरचंद, तुळस, हळद, तूप, देशी गाईचे दूध, सैंधव मीट,भाकरी.
आयुर्वेदिक औषधे -खादिरारिष्ट,महामंजिष्ठादी काढा, महातिक्तक कषाय, पंचतिक्त घृत.
उपाय –
1)वमन -विरेचनादी पंचकर्म, रक्तमोक्षण.
2)दररोज 1चमचा एरंडेल तेल दिवसातून एकदा तरी घ्यावे.
3)खादीर, मंजिस्टा, शुद्ध गंधक, त्रिवंग भस्म, गुडूची, निम, चक्रमर्द,ताल सिंधुर,त्रिफळा चूर्ण एकत्रित करून 1 वाटी कोमट पाण्यातून सकाळी व रात्री घ्यावे.
4)केमिकलयुक्त साबण बंद करून त्या जागी तेल लावावे व घासून अंघोळ करावी.
5)जालीम लोशन, पारसमनी क्रीम, बोरिक पावडर लावावी
6)साबण लावायचा असल्यास “पंचगव्य “साबण वापरावा. तो देशी गाईच्या 5तत्वापासून बनवीत असल्यामुळे तो केमिकल फ्री असतो.
7)अंघोळीचे पाणी कडुनिंब घालून गरम करावे, कारण त्यात गंधक असते.
8)खाज जास्त उठत असल्यास खोबरेल तेलात कापूर कुटून लावल्यास खाज कमी होते व झोप लागते.
9)लिंबूचा रस चोळावा.
10)पांढऱ्या रुईचा चिक, हळद, कापूर एकत्रित करून लावावे.
11)ओलसर कपडे न वापरता, ती जागा कायम ड्राय ठेवावी.
12)चक्रमर्द चूर्ण चा लेप करावा.
13)सुती कपडे वापरावेत.
14)करंज तेल लावावे व स्वेदन करावे.
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
संपर्क -9175723404,7028612340