पुलाची शिरोली येथे संत सद्गुरू बाळूमामा व ओम दत्त चिले महाराज पालखी सोहळा उत्साहात

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

 

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥१॥

या सुभाषिताचा उल्लेख करायचं कारण म्हणजे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शिरोली पुलाची येथील संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज मंदिर येथील विशाल स्वरुपात वाटप होणारा महाप्रसाद या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी शिरोली पंचक्रोशीतील अबाल ते वृद्ध भाविकांची एकच झुंबड उडते,शिरोली पुलाची येथील नवीन धनगर वसाहत , अहिल्याईनगर येथील संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज पालखी सोहळ्या निमित्त चविष्ट चवदार महाप्रसादाची ३८ वर्षांपासूनची परंपरा आहे.
१९८४ साली बायक्का हिरवा गावडे यांच्या घरी या महाप्रसादाची सुरवात झाली.त्या नंतर कृष्णात सुबाजी पुजारी यांनी उद्धव पुजारी यांना १९९२ साली सांगीतले की अहिल्यादेवी नगर इथे बाळू मामाचे  मंदिर बांधा व मुर्तिची प्रतिष्ठापणा करा असे सांगीतले.संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज मूर्तीस पहाटे जल व दुग्ध अभिषेक केला जातो सोहळा, दुपारी बारा बारा वाजल्या नंतर मिरवणूक सायंकाळी पाच वाजेपर्यंत गावातील मुख्य मार्गावरून निघते तसेच गावातील मंदिरामध्ये पालखी जाऊन भेट घेत राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या मंदिरामध्ये ढोल कैताळाच्या निनादात मंदिरामध्ये येते पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडतो.त्यानंतर हे राम खेळले जाते हे झाल्यानंतर सायंकाळी सात नंतर महाडीक हायस्कूल च्या भव्य पटांगणात महाप्रसाद वाटप होते .
१९८४ साली सुरू झालेला १०० लोकांचा महाप्रसाद  आज रोजी इथं महाप्रसादाचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या ही सुमारे ३५ हजारांहून अधिक आहे.इतक्या भव्य स्वरूपात वाटप होणाऱ्या महाप्रसादासाठी १५०० किलो गहू तर २००० किलो तांदूळ इतकं धान्य खर्ची पडले .आबालवृद्ध यांच्या सह पुरुष व स्त्रि भाविक यांची संख्या ही लक्षणीय असते. त्यानंतर रात्रभर भक्तीमय वातावरणात भजन देवाच्या ओव्या गाईले जातात
या महाप्रसादाचं संयोजक हे धनगर समाज व अहिल्यादेवी होळकर मंडळ यांच्या वतीनं केलं जाते . तसेच या महाप्रसादासाठी शिरोली ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थ दानशूर व्यक्ती गावांतील तरूण मंडळे सामाजिक कार्यकर्ते यांचे बहुमोल योगदान आहे .

Spread the love
error: Content is protected !!