व्हेरीकोज व्हेन म्हणजे काय ? लक्षणे, आयुर्वेदिक उपाय 

पायावरील शिरा निळ्या -काळ्या पडतात,नागमोडी होऊन सुजतात यालाच व्हेरीकोज म्हणतात.धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिमध्ये,उतरत्या वयात व महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.
कारणे –
सतत उभे राहणे,लठ्ठपणा,मधुमेह, अति श्रमदान, अति चालणे,अति स्नीग्ध गुरु अन्न,फ्रिज मधील पदार्थ, शिरांची लवचिकता कमी होणे,रक्त पुरवठा सुरळीत न होणे.
लक्षणे –
पायातील शिरा फुगणे,निळसर होणे,खाज सुटणे,दुखणे,काही लोकांमध्ये तर अल्सर देखिल होतात, शिरांमध्ये रक्ताच्या गुठल्या तयार होणे.
तपासणी -Colour Doppler.
अपथ्य (काय खाऊ नये) –
तेलकट,मसालेदार पदार्थ,कोल्ड्रिंक,फ्रिज मधील पदार्थ,पचणास जड पदार्थ,शेंगदाणे,वाळलेले खोबरे,पापड, लोणचे,हरभरा,पावटा,वरणा, बटाटा,तूरडाळ,मुळा,अळू,नॉनव्हेज,चहा,दही, वांगी.
पथ्य (काय खावे)- सर्व फळे,ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या,काकडी,बिट,गाजर, दुधीभोपळा,पडवळ,दोडका,भेंडी,गवारी,घेवडा, शेवगा,ढबूमिरची,मूग डाळ,बिन पॉलिश केलेला भात,कोमट पाणी,ज्वारीची भाकरी.
आयुर्वेदिक औषधे – कैशोर गुग्गुळ, सारिवाद्यासव,महामंजीष्ठादी काढा,चिरबिल्वादी काढा.
उपाय –
1)त्रिफळा,मंजिष्ठा,सारिवा,पुनर्नवा,अर्जुन,गुडूची यांचा काढा बनवून पिणे.
2)जेवनामध्ये कच्चा कांदा, कच्चा लसूण चा वापर करावा.
3)गरम प्रसरणी तेलाने मालिश करावी आणि नंतर काळ्या वाळूचा शेक,व पोट्टलीचा शेक (आयुर्वेदिक औषधांच्या पुरचुंडीचा शेक)द्यावे.
4)रक्तमोक्षण -जळू लावावा /किंवा सुईने तेथील साखळलेले दूषित, घट्ट रक्त काढावे.
5)झोपताना पाय उंचीवर ठेवावे.
6)दिवसा घट्ट स्टॉकिंग घालावे.
7)रात्री झोपताना बजरंग लेप लावावा व सकाळी कोमट पाण्याने धुवावे. लेप मुळे सूज कमी होते व रक्त पुरवठा सुधरतो.
8)ऐकूप्रेशर ने गुण लवकर येतो.
9)योगामध्ये उत्तनासन, नवासन, विपरीत करनी, सर्वांगासन, मस्यासन, पवनमुक्तासन, बलासन यांचा उपयोग करावा.
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार निंगनुरे
संपर्क -9175723404,7028612340
Spread the love
error: Content is protected !!