सदलगा शहरी केंद्र शासकीय योजनांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सेवेचे सोच सफल केंद्राचे मोठ्या उत्साहाने उद्घाटन
सदलगा शहर प्रतिनिधी / अण्णासाहेब कदम
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रशिक्षण देणारे केंद्र “सोच सफल केंद्र” याचे उद्घाटन आज सदलगा नगरपालिका सदलगा येथिल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद भोसले ,सदलगा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक पी एम भोजे,सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम,सदलगा नगरपालिकेचे एफ् डी ओ श्री लहू मदाळे,विजय कोकणे,बी ए एन फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत एच व्ही माळगे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.उद्घाटनाप्रसंगी आपल्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत माळगे यांनी सांगितले की, समाजातील सर्व वयोगटातील सर्व नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे हे पहिले सोच सफल केंद्र आहे.ज्या केंद्रामध्ये मुले, किशोरवयीन,तरुण,प्रौढ,आणि ज्येष्ठ नागरिक महिला,युवक,विद्यार्थी स्वयंरोजगाराच्या व्यक्ती यांना मार्गदर्शन,प्रशिक्षण,आधार आणि सेवा प्रधान करणारे व नोकरी शोधून स्वयंरोजगार निर्माण करणारे असे हे अनोखे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.आणि अशा या समाजसेवी सेवाभावी केंद्राचे उद्घाटन आज आपल्या शहरात होत असल्याने याचा आम्हाला सर्वांना आनंद होत आहे.असे सांगितले.आणि सदलगा शहर परिसरातील सर्व समाजातील घटकांनी याचा लाभ घ्यावा व आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे आवाहन केले.या सोच सफल केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे सहाय्यक मिलिंद घाटगे, सौ.शिल्पा पाटील, सौ.सारिका पाटणकर, सदलगा सोच सफल केंद्राचे कोऑर्डिनेटर श्री सुनील बेळकुडे,पूजा माळगे, अरविंद म्हेत्रे, शिवराज झापरे,इत्यादी मान्यवरांसह अनेक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते.