पुणे / प्रतिनिधी
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूरचे विद्यमान संचालक,माजी चेअरमन व छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन एस.व्ही.पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गेल्या ४० वर्षांतील त्यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव विचारात घेता,पदवीधरांच्या रास्त मागण्या, हक्क आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा अनुभव नक्कीच मोलाचा ठरेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये बजरंग कुलगुडे,एम.डी. पाटील,संभाजी एकशिंगे,सुनील ढवळे,बाजीराव खेडकर,रामदास नागरे,अभिजीत पाटील,विक्रम पवार,पुरुषोत्तम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”शिक्षित पदवीधरांचा आवाज… आमची जबाबदारी…” आणि “शिक्षित समाजाच्या हक्कांसाठी… एकजुटीने, पुढे चला!” या संकल्पनेसह ही उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.