नागाव येथे मटका बुकीवर कारवाई, ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर कारवाई

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

 नागाव, ता. हातकणंगले येथे कल्याण मटका घेणाऱ्या दोघांवर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करून ५ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई एचएमटी फाटा येथील एडेश्वर कलेक्शन दुकानाजवळ करण्यात आली.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार नागाव येथील एचएमटी फाटा येथील सेवा रोडला असलेल्या एडेश्वर कलेक्शन दुकानाजवळ बंद असलेल्या दुकान गाळ्याच्या आडोशाला माणिक रामचंद्र काशीद (वय ६३, रा. तासगाव, ता. हातकणंगले) व भाऊसाहेब दादासाहेब नागावकर (रा. माळवाडी, नागाव, ता. हातकणंगले)

याचा काशीद हा स्वतःच्या फायद्यासाठी नागावकर यांच्याकडून १० टक्के कमिशनवर लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्या देऊन जुगार खेळत व खेळवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कम ५७०० रुपये व पेन, पांढऱ्या, लाल व पिवळ्या रंगाची कल्याण मटक्याचे स्लीप बुक असा मुद्देमाल जप्त करत काशीद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. नागावकर हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबतची फिर्याद व कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल रामचंद्र शामराव कोळी, वसंत पिंगळे, सुभाष सरवडकर केली. या कारवाईमुळे शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले.

Leave a Comment

error: Content is protected !!