वाढदिवसानिमित्त राजाराम विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिरोळ / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळांनीही या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षणाची द्वारे खुली केली आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होत आहे. शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू असे आश्वासन येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे सदस्य डॉ अतुल पाटील यांनी व्यक्त केला. येथील राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त डॉ. अतुल पाटील यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. याप्रसंगी ते बोलत होते. शिरोळ रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या माध्यमातून आणि डॉ.अतुल पाटील यांच्या योगदानातून शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्यावतीने डॉ. अतुल पाटील यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार यांनी केले. रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्रा. काशिनाथ भोसले, सदस्य माजी प्रा. एस. एस. पाटील, पत्रकार चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त करून शाळेला रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य उल्हास पाटील,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव कांबळे, सदस्य व पत्रकार बाळासाहेब कांबळे, शिक्षक सुनील घुमान्ना, रवींद्र वाघ, प्रतिभा साळोखे,अश्विनी पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.