बाळासाहेब माने सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध; भीमराव इंगळे चेअरमन, सर्जेराव माने उपाध्यक्ष

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

बाळासाहेब माने विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित,शिरोळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2026 बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी भीमराव इंगळे यांची तर उपाध्यक्ष (व्हा. चेअरमन) पदी सर्जेराव माने यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक बिनविरोध झाल्याने संस्थेच्या कार्यक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवडीनंतर नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाने शिरोळचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन शुभेच्छा व मार्गदर्शन घेतले.यावेळी आमदार यड्रावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संस्थेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि ग्रामीण विकासासाठी प्रभावी काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी संस्थेचे सर्वेसर्वा युवा नेते रणजीतसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मार्केट कमिटीचे संचालक रामदास गावडे, दिलीपदादा पाटील विकास संस्थेचे चेअरमन आप्पासो काळे, छत्रपती शाहू विकास संस्थेचे चेअरमन गजानन चव्हाण, युवराज आनंदराव जाधव यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सभासदांमध्ये एकोपा आणि विकासाभिमुख भूमिका अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.नव्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षमपणे कार्यरत राहून सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.ग्रामीण भागातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!