यशस्वी माणसाच्या जीवनात पुस्तकाची मार्गदर्शकाची भूमिका : चंद्रकांत भाट

Spread the love

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पुस्तक दिन उत्साहात

 

शिरोळ / प्रतिनिधी 

 विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात “जागतिक पुस्तक दिन ” तथा इंग्रजी साहित्यिक “विल्यम शेक्सपिअर ” यांची पुण्यतिथी व जयंती साजरी करण्यात आली .यावेळी संस्थेचे सचिव प्रा. मेजर के. एम्. भोसले, संस्थेचे संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास पाटील,वृत्तपत्र विक्रेते चिदानंद कांबळे, लेखक सचिन कोरोचीकर, पत्रकार चंद्रकांत भाट, मदन गावडे सामाजिक कार्येकर्ते अमोलराज शिरोळकर, अरविंद कांबळे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन व प्रतिमापूजन करण्यात आले .स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कु. अमृता लाड , कु. हर्षदा चव्हाण , कु. सुहाना चिकोडे , कु. आफशा मुल्लांनी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .वृत्तपत्र विक्रेते चिदानंद कांबळे यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक ही माणसं घडवण्याचं कामं करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने किमानं एक तरी पुस्तक वाचले पाहिजे असे प्रतिपादन केले .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पत्रकार चंद्रकांत भाट यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की , विद्यार्थ्यांनी आता या बालवयातच वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे , वाचणामुळे तुमचा शब्दसाठा वाढतो. प्रत्येक यशस्वी माणसाच्या जीवनात पुस्तकांनीच मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आत्तापासूनच आपण पुस्तकाला मित्र बनवले पाहिजे असे प्रतिपादन केले.लेखक ,तथा इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक आदरणीय सचिन कोरोचीकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की , प्रत्येकामध्ये काही सुप्त गुण दडलेले असतात , आपल्यामध्येच कवी , लेखक , साहित्यिक दडलेला असतो , फक्त आपण त्या कलागुणांना वाव दिला पाहिजे . त्याचबरोबर अमेरिका आणि इराण यांच्या युद्धावर आधारित एक सुंदर कविता विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सादर केली.विद्यालयाचे सहा : शिक्षक आसिफ पैलवान यांनी विल्यम शेक्सपिअर यांच्या जीवन कार्याची माहिती करून दिली .तसेच संस्थेचे सचिव प्रा. मेजर . के. एम्. भोसले सर यांनी पुस्तक दिन का साजरा केला जातो ? त्या पाठिमागे असणारा उद्देश ? याविषयी माहिती दिली .आभार शिक्षिका सौ. जयश्री पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन नितीन बागूल यांनी केले .विद्यालयाचे शिक्षक पृथ्वीचंद माछरेकर , श्रीकांत कोळी, धनश्री माने, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्जेराव पोवार , सुप्रिया दाभाडे , सिद्धार्थ कांबळे, अभिषेक ढोकळे, सौ. वैशाली भारमल यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!