डॉ.दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस न मानता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी म्हणून साजरा करण्याचा आदर्श येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दगडू माने यांनी घालून दिला आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.डॉ. माने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आई’ वृद्धाश्रम येथे “आयुष्याची संध्याकाळ” या विषयावर विशेष संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी वृद्ध मातांशी स्नेहपूर्वक संवाद साधत त्यांच्या भावना, अनुभव आणि जीवनातील संघर्ष समजून घेतले.वृद्धांना आधार,सन्मान आणि आपुलकीची गरज अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांना संवेदनशीलतेचा संदेश दिला.या संवादामुळे वृद्धाश्रमातील वातावरण भावूक आणि प्रेरणादायी झाले.यानंतर शिरोळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता कांबळे व उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या,पेन,पुस्तके यांसारख्या आवश्यक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी ऊर्जा मिळाली.शिक्षण हाच विकासाचा पाया आहे,या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. तसेच कलाकार कुणाल कांबळे यांच्या निर्मितीतून साकारलेल्या महामानवांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीतगायन कार्यक्रमाला ५ हजार रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला.समाजात जागृती निर्माण करणाऱ्या आणि सकारात्मक विचारांना चालना देणाऱ्या कलाप्रकारांना पाठबळ देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न मानला जात आहे.या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यादवनगर येथे शिरोळ तालुका लोककलाकार संघटना व श्री संत रोहिदास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात एकपात्री नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान यांच्या स्वागतपर भाषणाने झाली.त्यांनी डॉ.माने यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.या प्रसंगी सामाजिक, राजकीय,सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ.दगडू माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.कार्यक्रमास नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,दिवाण कोळी,स्नेहल कुलकर्णी,कुणाल कांबळे,मनीषा बहेनजी,अर्चना बहेनजी,हेमलता जाधव, शिवाजीराव पाटील-कौलवकर,भैय्यासाहेब कुलकर्णी,गजानन संकपाळ,बाळासाहेब माळी,अभिजीत माने, राजेंद्र दाभाडे,दिलीप शिरढोणे,अनिल पाटील, गजानन माने,फौजी राजाराम माने,पी.वाय. कुंभार,संतोष वनखडे,अविनाश माने,सनाऊला तहसीलदार,शिवगोंडा पाटील,विनोद माने, प्रवीणभाई मानगावे, राजू देशमुख, सय्यद पिरजादे, सुनिता पाटील,अनिता पाटील, दीपा मुंगळे, प्रदीप आयगोळे, सुधाकर तावदारे, संगीता माने, मदन गावडे, विवेक फल्ले, बबन पुजारी, अमर रजपूत, अशोकराव कांबळे, अतुल भोजने, अजित मांगुरकर, राहुल डोंगरे, मोहन कुंभार, चिदानंद कांबळे, राजू माने, फुलकेश कांबळे,दीपक महानाम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे समारोप सचिन कमलाकर यांनी आभार प्रदर्शनाने झाला.डॉ.दगडू माने यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून,समाजासाठी जगणे हाच खरा उत्सव हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!