शिरोली परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई ८ जण ताब्यात ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली एमआयडीसी पोलीसांकडून अवैधरीत्या सुरू असणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर कारवाई करून जवळपास ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करत जणांना ताब्यात घेण्यात आले हि कारवाई मंगळवारी रात्री ९ वाजण्यासुमार करण्यात आली .पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक २४ रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील माळवाडी भागात असणाऱ्या माऊली वजन काट्याजवळील एका मोकळ्या जागेत काही लोक बेकायदेशीररीत्या ‘तीन पानी’ पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला असता शरद उमेश सूर्यवंशी (वय ३७) , इर्शाद हुसेन येळापुरे (वय ३७) , अमीर गणी सनदी (वय ३५) , मोसीन रहीम मुजावर (वय ३७) , भरत दत्तू पाटील (वय ५२) , अरुण यशवंत हंकारे (वय ४२) , दिलीप गोविंद लोढे (वय ५९) , रसुल शरफुद्दीन मणेर (वय ४२) हे लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याचे दिसून आले त्याना ताब्यात घेत त्यांच्याकडून १६ हजार ७८१ रूपये रोख व ६४ हजारांचे मोबाईल असा ८० हजार ७८१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला .या मंगळवारी एकच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड , रामचंद्र कोळी, महेश आंबी, विश्वास चिल्ले, तुकाराम कुंभार, होमगार्ड सनंद चव्हाण आणि इम्रान म्हालदार यांच्यासह पथकाने कारवाई केली. अशा प्रकारची शिरोली स्थानिक पोलिसांनी व गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे इथून पुढे ही अशा प्रकारच्या कारवाई करून अवैध धंद्यांची पाळेमुळे नष्ट करावीत अशी मागणी जनतेतून होत आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!