इचलकरंजी / प्रतिनिधी
वृत्तपत्र विद्या पदवी प्रथम वर्ष परीक्षेत नाईट कॉलेज इचलकरंजी मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल दिलीप शिरढोणे सरांचा सन्मान थायलंड सरकारचे सल्लागार आणि गोकूळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ.नरके यांनी दिलीप शिरढोणे सरांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.या प्रसंगी इंडस्ट्रीयल इस्टेट इचलकरंजीचे चेअरमन राहूल खंजिरे, दे.भ.बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन बाळकृष्ण मुरदंडे, नाईट कॉलेजचे प्राचार्य विरूपाक्ष खानाज,नवे दानवाडचे सरपंच डॉ.सी.डी.पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. पाटील यांनी शिरढोणे सरांच्या कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळवण्याचे महत्त्व सांगितले.दिलीप शिरढोणे सर यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने हे यश मिळवले असून, यापुढेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत शिक्षण क्षेत्रात नाव कमवावे,अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली गेली.या सन्मान समारंभामुळे इचलकरंजीतील शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.