राष्ट्रीय खेळाडू कृष्णा पाटील यांची ठाणे महापालिका उपमहापौर पदी निवड, क्रीडा क्षेत्राला मिळणार बळ 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी 

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा ठाणे भाजपचे नवनिर्वाचित उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांचा क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पुलाची शिरोली येथील नवभारत क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय व प्रो कबड्डी खेळाडू सागर खटाळे,बाल शिवाजी मंडळ शिरोळचे राष्ट्रीय कबड्डीपटू अमित उर्फ बंटी संकपाळ, युवा उद्योजक व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नरेंद्र माने तसेच हॉटेल मित्र प्रेमचे मालक सचिन सावंत यांनी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले.कृष्णा पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावचे सुपुत्र आहेत. ग्रामीण मातीतून पुढे येत त्यांनी ठाणे शहराच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या स्वर्गीय मातोश्री गेली दहा वर्षे ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात कृष्णा पाटील व त्यांच्या पत्नी सौ. नंदा पाटील यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून नगरसेवक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली आहे. सध्या दोघेही विद्यमान नगरसेवक म्हणून जनसेवेत कार्यरत आहेत. राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्राशी त्यांचे घट्ट नाते आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या लहान बंधू राष्ट्रीय कबड्डीपटू सचिन दादू पाटील हे देखील भाजपचे ठाणे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत असून क्रीडा व संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय आहेत.पाटील कुटुंबीय राजकारणाबरोबरच खेळाडूंच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असतात.गरज भासल्यास आर्थिक, प्रशासकीय किंवा वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची त्यांची तयारी असते. ठाण्यात उच्च पदांवर कार्यरत असले तरी कोल्हापूरच्या मातीतली त्यांची नाळ आजही घट्ट जोडलेली आहे.या भेटीत उपस्थित खेळाडूंनी कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करत भविष्यातही क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!