मातोश्री बालविद्यालय शिरोली पुलाची शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न  

Spread the love

 पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील मातोश्री बाल विद्यालय या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला हा कार्यक्रम सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी कालिका मंगल कार्यालय शिरोली पुलाची या ठिकाणी संपन्न झाला.शिरोली येथील मातोश्री बाल विद्यालय या शाळेचे विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा कालिका मंगल कार्यालय या ठिकाणी सादर झाला या संमेलनामध्ये देशभक्तीपर गीते कोळीगीते विनोदी नाटक लावणी बालगीते या विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मातोश्री बालविद्यालय ही शाळा गेली 15 वर्षे ज्ञानदानाचे कार्य करत आहे या शाळेमध्ये शिकून आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत केलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र निकम सर सेवानिवृत्त प्राचार्य मुसळे विद्यालय इचलकरंजी प्रमुख पाहुणे सुभाष पाटील सर मुख्याध्यापक राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली (पु) प्रमुख उपस्थिती अनिल पाटील सर मुख्याध्यापक आदर्श विद्यालय नागांव सूर्यकांत धनवडे संस्थापक मातोश्री बालविद्यालय गणेश खवरे उद्योजक सुनील चौधरी अध्यक्ष मातोश्री शिक्षण संस्था इचलकरंजी कुबेर हंकारे व संदीप कांबळे पत्रकार व आस्मिता दिघे समाजसेविका या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र निकम सर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर सुनील चौधरी सर यांनी स्वागत व सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामचंद्र निकम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यातून त्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शाळेचे वार्षिक संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या साठी व्यासपीठ मिळते त्यामुळे त्यांच्या कौशल्याला व नेतृत्वाला वाव मिळतो नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रात उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो असे म्हटले जाते.या समारंभात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मान चिन्ह देण्यात आले तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच श्री गणेश खवरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वप्नाली विनायक चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष सुनील चौधरी सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.आभार सौ कांबळे मॅडम यांनी मानले.वंदे मातरम या राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!