श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवात हर हर महादेवच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. आज महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच वाजता शिवलिंगास महाअभिषेक करण्यात आले.या महाअभिषेकानंतर सकाळी सात वाजता सामुदायिक शिवलीला “गणमृत” या ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले.या पारायणास गावातील १५१ महिला-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारलेला दिसला.सायंकाळी सहा वाजता पुन्हा एकदा शिवलिंगाचे महाअभिषेक करण्यात आले, तर भक्तांनी हर हर महादेवच्या गजरात दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भक्तांची रांगे लागल्या होत्या. मंदिराच्या परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता आणि आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.महाशिवरात्रीच्या द्वादशीला महाप्रसादाचे आयोजनही मंदिर व्यवस्थापन समितीने केले होते.येथील शिवलिंग अत्यंत प्राचीन असून, करवीर महात्म्यातही याचा उल्लेख आढळतो, ज्यामुळे येथे भक्तांचा सतत मोठा विश्वास राहतो.या महाशिवरात्रीचे आयोजन मंदिर देवस्थान समिती आणि गावातील विविध प्रतिष्ठित नेत्यांनी केले.यामध्ये उत्तम पाटील महाराज, मधुकर पद्मई, भारत चव्हाण, गणेश पाटील, अजित संकपाळ, अजित पाटील, केदार पाटील, अनिल यादव, रुपेश पाटील, अमोल यादव, सदाशिव बरवाडे, निलेश चौगुले, करण पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.भक्तांनी धार्मिक विधींचा आनंद घेतला, दर्शन घेतले आणि प्राचीन शिवलिंगाची पूजा करून महाशिवरात्रीची सक्रीय आणि भक्तिभरीत साजरी केली.मंदिरातील या उत्सवामुळे गावात एक दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आणि सर्व भक्त आनंदाने मंदिरातून परतले.

पुलाची शिरोलीच्या श्री सर्वेश्वर महादेवाची प्राचीन महात्म

इसवी सन १८०३ मध्ये सखलशेतीवडीत सर्वेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. सन १९९८ पर्यंत या मंदिराला पत्र्याचे शेडवजा कौलारू घराचे स्वरूप होते.दिवसेंदिवस सर्वेश्वर महादेवाची ख्याती आणि महिमा सर्वदूर पोहचू लागली. त्यातून विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाऊ लागले. भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर जीर्णोध्दाराचा निर्णय गायकन्यांनी घेतला. सध्या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी भक्त सढळ हाताने मदत करत आहेत. मदत करणाऱ्या भक्तांची संख्या आणि देणगी स्वरूपात मिळणारी मदत पाहता सर्वेश्वर महादेवाची महिमा सर्वदूर पोहचल्याचे ठळक होते.गावातील लोकांत भक्ती वाढविण्यासाठी कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसाद करण्यास सुरुवात केली.कालांतराने महाप्रसादाचा मान हुबाळे, शिरगावकर घराण्याकडे आला महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन घराण्यांमार्फत जोशी यांच्या घरी महाप्रसादाचे साहित्य दिले जाते.१८०३ मध्ये शिरोली गावाच्या पश्चिमेला सखल नावाच्या शेतवडीत म्हणजेच सर्वेश्वर तलावामधील सर्वेश्वरलिंगाची स्थापना मार्तंड जोशी, भाऊसो पोतनीस, बाळया स्वामी व कुलकर्णी या प्रमुख लोकांनी गावातील स्वामींच्या मठाजवळ केली. या लिगाची पूजा करण्याची जबाबदारी नारायण श्रीपाद जोशी घराण्याकडे देण्यात आली. १९९८ पर्यंत हे महादेवाचे मंदिर कौलारू व पत्र्याच्या शेडमध्ये २५ बाय ३० जागेत होते. या मंदिरामध्ये फक्त महानंदी लिंग होते. कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसादाचे आयोजन करण्या स सुरुवात केली कालांतराने या महाप्रसादाचा मान उबाळे व शिरगावकर या घराण्याकडे देण्यात आला.या महादेव मंदिराऐ जर्णोद्धार करण्यासाठी गावात भक्तीमय वातावरण टिकून राहण्यासाठी धार्मिक कार्यकमांची सुरुवात १९८६ पासून बाजीराव पाटील पाटील, चंपाबाई सुतार, भागिरथी परीट, विजय यादव या प्रमुख मंडळींनी केली. प्रत्यक्षात या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यासाठी १९९५ साली गावातील लोकांची एक कमिटी स्थापन करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली.सुरुवातीस मंदिराच्या परिसरात कूपनलिका खोदण्यात आली. ६ लाख खर्च करून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मंदिरातील फरशी व इतर सजावटीचे पूर्ण झाले असून, मंदिरा मध्ये कोणताही धार्मिक विधी असो किंवा मंदिरासाठी कोणतेही मोठे कार्य करण्याचे असो शिरोलीच्या भाविकांना मदत आव्हान केले की शिरोलीचे भाविक सढळ हाताने मदत करतात.

Leave a Comment

error: Content is protected !!