पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर असलेल्या मार्बल लाईन मधील ‘रिगल सिरॅमिक्स’ या दुकानाच्या गोदामाला आज अचानक आग लागून गोदामातील ८० लाखाचे महागडे सिरँमिक्स साहित्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणली तर या आगीची तीव्रता पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.हि घटना शुक्रवारी सायंकाळी ७ : ३० वाजण्यासुमार घडली.या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ७ : ३० वाजण्यासुमार मार्बल लाईन येथील सर्व दुकाने बंद करून मालक व कामगार सुट्टी करून घरी जाता हा त्यांचा नेहमीचाच दिनक्रम असल्याने नेहमी प्रमाणे रिगल सिरॅमिक्सचे ही दुकान बंद करून मालक राजन जालावडीया व कामगार घरी जात असताना दुकानाच्या मागील बाजूस मोठे गोदाम असून या गोदामातून मागील बाजूने धुराचे लोट व सिरँमिक्स फूटत्याला आवाज बाहेर येऊ लागले हे शेजारी असणारे वाचमन राजेंद्र काळे यानी पाहिले त्यानी पुढे जावून सर्व प्रकार दुकान मालकास सांगितला मालकाने गोदामाकडे धाव घेवून आग विजवण्या प्रयत्न केला पण आग आटोक्यात येत नव्हती पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.गोदामात सिरॅमिक्सच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात पॅकिंगचे साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे शेजारील इतर दुकाने आणि मालमत्तेचे संरक्षण झाले.या लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या भागातील वीजपुरवठा खंडित केला.यामुळे शॉर्ट सर्किटमुळे होणारा संभाव्य धोका आणि आगीचा अधिक प्रसार टळला.कर्मचाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत फर्निचर, सिरॅमिक्स साठा व गोदाम शेडचे मिळून ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही,मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे नवनाथ साबळे , ड्रायव्हर वामन चौरे,निलेश तांडेल,संभाजी शिनगारे,फायरमन ढेपले,आयुष आदवडे,मंगेश पालशेतकर,फैजान जमादार,मेहबूब खुटेपड, अजम फकीर योगेश पुजारी एम एस ई बी कर्मचारी उपस्थित होते.