४ किलो गांजासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त : एकास अटक

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

 

पुलाची शिरोली येथील गांजा विक्री करणाऱ्या तरुणास गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून ४ किलो गांजा , दुचाकी , मोबाईल असा दिड लाखाचा मुददेमाल जप्त केला. हि कारवाई पुलाची शिरोली येथील पाण्याच्या टाकी जवळ बुधवारी रात्री साडे नऊ वाजता करण्यात आली.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून आठ दिवसात दुसर्‍यांदा कारवाई मग स्थानिक पोलिस करतात तरी काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमरअली इस्माईल पटेल (वय ३१, रा.पुलाची शिरोली) असे असून तो बुधवारी रात्री पुलाची शिरोली येथील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. उमरअली पटेल तिथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. व त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ०४ किलो १२० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तातडीने गांजासह त्याची दुचाकी आणि मोबाईल असा १ लाख ५४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने शिरोली एमआयडीसी परिसरात चोरून गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई व कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो, मा. अप्परपोलीस अधीक्षक डॉ. बी.धिरजकुमार साो, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग श्री. सुजितकुमार शिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत जाधव,अशोक पोवार, महेश आंबी, विनायक चौगुले, संदिप पाटील,वसंत पिंगळे, राजू येडगे, सुशिल पाटील, अरुण धनगर यांनी केली आहे. दरम्यान शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) दुसऱ्यांदा मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे स्थानिक शिरोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता जनसामान्यातून गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!