पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवले आहे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाडिक गटाच्या तिन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत विजय संपादन केला ही निवडणूक अत्यंत चुरशीच्या आणि प्रखर राजकीय संघर्षात रंगलेल्या या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम जातीय समीकरणांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, एका मुस्लिम उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे .संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या शिरोली पुलाची जिल्हा परिषद मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सलीम महात हे ९५९ मतांनी विजयी झाले सलीम महात यांना १२२९२ तर प्रतिस्पर्धी शाहू स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार शशिकांत खवरे यांना ११३४३ इतके मतदान झाले. शाहू स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार शशिकांत खवरे यांनी धनशक्ती विरोधात तरुणांच्या पाठबळावर तोडीसतोड लढत दिली पण निसटता पराभव पत्करावा लागला . शिरोली जिल्हा परिषद मतदार संघातून आमदार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांनी प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ महाडिकांचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे हा मतदारसंघ महाडिक यांच्या साठी प्रतिष्ठेचा ठरला होता पण खवरे यांनी या बालेकिल्ल्याला एक प्रकारे सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत खवरे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्यामुळे आमदार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांनी सलग दोन दिवस गावातील घरोघरी भेटीगाठी भर देत मतदारांची व पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. शशिकांत खवरे यांना नागाव,टोप,संभापूर सोनार्ली वसाहत या गावातून अपेक्षेपेक्षा अत्यंत चांगले मतदान झाले पण शिरोली गावातून कमी झालेल्या मतदानामुळे खवरे यांचा अपेक्षा भंग झाला आहे.असे या निकालामुळे सिद्ध झाले आहे. तसेच मतदानापूर्वी दोन दिवस मतदार संघात घरोघरी कार्यकर्त्यांनी लक्ष्मी दर्शन घडविले. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला असल्याचे नागरीकांच्यातून दबक्या आवाजात बोलले जात आहे. खवरे नेहमीच महाडिक यांच्या सारख्या बलाढ्य शक्तीला आव्हान दिले आहे. पण जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी झालेल्या या लढतीत शशीकांत खवरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नागाव पंचायत समिती मध्ये मोठ्या फरकाने अरूण माळी ७०१५ तर शिरोली पंचायत समिती मध्ये कमल कौदाडे ६७८२ यांनी सहज विजय मिळवला आहे. स्थानिक शाहू स्वाभिमानी आघाडीचे पराभव उमेदवार नागाव अभिनंदन सोळांकुरे ५८४१ तर शिरोली शुभांगी पाटील याना ४४०२ मताधिक्य मिळाले या निवडणुकीत त्याना पराभव पत्करावा लागला आहे. हि निवडणूक जाहीर झाल्यापासून शिरोलीत राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विकासकामांच्या मुद्द्यांसोबतच छुपी जातीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून झाल्याचे बोलले जात होते. प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच, मतदारांनी मात्र कोणत्याही ध्रुवीकरणाला बळी न पडता उमेदवाराच्या गुणवत्तेला प्राधान्य दिल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. हा विजय केवळ एका धर्माचा किंवा जातीचा नसून, सर्वधर्मीय बांधवांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे,” अशा भावना विजयी उमेदवाराने विजयानंतर व्यक्त केल्या.