तळंदगे ग्रामस्थाकडून आंदोलन अंकुशच्या शिलेदारांचा सत्कार

Spread the love

 

तळंदगे / प्रतिनिधी

गत वर्षी तुटलेल्या उसास दुसरा हप्ता 100 रुपये व चालूला एफ आर पी अधिक 100 रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिल्याबद्दल आंदोलन अंकुश च्या शिलेदारांचा सत्कार तलंदगे ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी तळदगे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री संदीप पोळ यांनी गावाच्या वतीने आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांचा सत्कार केला व शेतकरी हिताच्या तसेच सामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी तळदगे गाव नेहमी आंदोलन अंकुश च्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.आंदोलन अंकुश चे तालुका प्रमुख दीपक पाटील आप्पासो कदम कृष्णा देशमुख भूषण गंगावणे सतीश माने एकनाथ माने महादेव काळे संभाजी माने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आंदोलन अंकुश च्या तळदगे शाखेचे प्रमुख मालगोंडा चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार रवींद्र उर्फ बंडू हवालदार यांनी मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वाघमोडे अमोल चौगुले अमोल शिंदे सुनील भोजकर तानाजी शिंदे सचिन चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!